गोव्यात गेल्‍या 5 वर्षांत 147 विदेशी वाहनांची आयात

गोव्यात (Goa) गेल्या पाच वर्षांत 147 विदेशी वाहने (Luxurious cars) आयात करण्यात आली आहेत
Over 140 cars have been imported in Goa in last five years (Image for representational use)
Over 140 cars have been imported in Goa in last five years (Image for representational use)Pixabay
Published on
Updated on

गोव्यात (Goa) गेल्या पाच वर्षांत 147 विदेशी वाहने (Luxurious cars) आयात करण्यात आली आहेत. त्यामध्ये दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर व हायड्रोलिक यंत्रसामग्रीचा समावेश आहे. या आयातीमुळे वाहतूक खात्याला सुमारे 8.97 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्‍या दोन वर्षांत खात्याचा महसुलाला कोरोनामुळे (COVID-19) लागलेली गळती, अजूनही सुरूच आहे. वाहने खरेदीचे (Vehicle sale) प्रमाण घटल्याने त्याचा परिणाम महसुलावर झाल्‍याची माहिती वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वाहतूक खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2017-18 या आर्थिक वर्षात वाहन नियम उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईतून 3.52 कोटी महसूल जमा झाला होता. त्यानंतर 2018-19 या वर्षात तो 3.28 कोटी तर त्यानंतर 2019-20 या वर्षी 2.34 कोटी रुपये होता. 2020 ते 2021 या वर्षात दंडात्मक महसूल 84 लाख रुपये तर एप्रिल 21 ते आतापर्यंत 9 लाख रुपये जमा झाला आहे. या तुलनेत पोलिसांच्या दंडात्मक महसुलाची रक्कम दरवर्षी 8 कोटींच्‍या आसपास असते.

Over 140 cars have been imported in Goa in last five years (Image for representational use)
सनबर्न बीच क्लबवर पडणार हातोडा!

मार्च 2020 नंतर देशाबरोबरच राज्यातही कोरोनाने थैमान घातल्यावर संपूर्ण व्यवसाय ठप्‍प झाला. त्याचा मोठा फटका वाहन उद्योगांना बसला. सहा महिने हा व्यवसायच बंद असल्याने तसेच अनेकांच्या नोकऱ्याही गेल्याने वाहने खरेदी मंदावली. दुचाकी वाहन खरेदीला मोठासा फरक पडला नसला तरी चारचाकी वाहनांवर बराच परिणाम झाला. त्यामुळे वाहन नोंदणीतून वाहतूक खात्याला मिळणाऱ्या महसुलात बरीच घट झाली.

Goa: Revenue generated from vehicle sales in the state
Goa: Revenue generated from vehicle sales in the stateDainik Gomantak

वाहनांवरील कर, वस्तू व प्रवासी कर तसेच इतर कर मिळून पाच वर्षांपूर्वी 342 कोटी रुपये महसूल जमा होत होता. मात्र 2020-21 या आर्थिक वर्षात तो 231 कोटींवर आला. 2019-20 या आर्थिक वर्षात तो 299 कोटी तर त्यापूर्वी 2018-19 या वर्षात 327 कोटी एवढा होता. यंदाच्‍या एप्रिल ते जुलै या चार महिन्‍यांत 51 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. वाहतूक खात्यासमोर या आर्थिक वर्षात सुमारे 350 कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट्य सरकारने अर्थसंकल्पात ठेवले आहे.

Over 140 cars have been imported in Goa in last five years (Image for representational use)
Goa Political show: काँग्रेसला सद्‍बुध्दी लाभो; मुख्यमंत्र्यांच्या गावात नियम 12 च्या भावात

राज्यात पर्यटक टॅक्सी व्यवसाय कोरोनामुळे थंडावला आहे. त्यामुळे या व्यवसायासाठी नवी वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्याही घटली आहे. या टॅक्सीवाल्यांनी गोवा माईल्स तसेच ॲप ॲग्रीग्रेस्‍टर्स बेज्ड टॅक्सींना विरोध करण्यासाठी गेल्यावर्षीपासूनआंदोलन सुरू केले आहे, ते अजूनही सुरूच आहे.

तीन लाख वाहने पडून

सुमारे १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात सुमारे १० लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी झालेली आहे, मात्र त्यातील दोन ते तीन लाख वाहने जुनी झाल्याने रस्त्यावर धावत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com