सनबर्न बीच क्लबवर पडणार हातोडा!

जीसीझेडएमएच्‍या निर्णयावर गोवा खंडपीठाचे शिक्कामोर्तब
सनबर्न बीच क्लब
सनबर्न बीच क्लबFacebook/ @sunburnbeachclub

पणजी: हणजूणमधील (Anjuna) बेकायदा सनबर्न बीच क्लबचे (Sunburn Beach Club) बांधकाम पाडण्याचा गोवा (Goa) किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकऱणाने (GCZMA) दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने (Goa Court) कायम ठेवला आहे. बांधकाम करण्यापूर्वी संबंधित अधिकारिणीकडे अर्ज न करताच अतिसंवेदनशील क्षेत्रात हे बांधकाम करण्यात आले आहे. एकदा बांधकाम पाडण्यात आल्यानंतर पुन्हा तेथेच बांधकाम केले गेले. या क्लबमध्ये सुरू असलेल्या व्यवसायाला ग्रामपंचायत, पर्यटक, अबकारी, अन्न व औषध प्रशासन पाठिंबा देते हे धक्कादायक आहे, असे निरीक्षणही निवाड्यात नोंदवले आहे. (Goa court orders demolition of Sunburn Beach Club)

सीआरझेडच्या ‘ना बांधकाम’ क्षेत्रात (एनडीझेड) कोणत्याही बांधकामाला परवानगी नाही. मात्र हणजूण येथे बेकायदा बांधकाम करून तेथील क्लबमध्ये बार, रेस्टॉरंट व नाईट क्लब सुरू केला होता. 2 मार्च 2021 घेतलेल्या 251 व्या बैठकीत हे बांधकाम नियमित करण्यास नकार देण्‍यात आला होता व ते त्वरित पाडण्याचे निर्देश दिले होते.

सनबर्न बीच क्लब
Goa Curfew: संचारबंदीत वाढ; बार ॲण्‍ड रेस्‍टॉरंट रात्री 11 पर्यंत खुले

बांधकाम पाडण्याची हमी कंपनीने दिली होती. मात्र तसे न करता या क्लबच्या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. ही आव्हान याचिका खंडपीठाने फेटाळून सदर अनधिकृत बांधकाम सीझेडएमपीने चार आठवड्यात पाडण्याची कारवाई करावी व त्‍याबाबतचा अहवाल खंडपीठाला सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

सनबर्न बीच क्लब
Goa: हरवळे धबधब्यात युवक बुडाला

क्लबचे तोंड समुद्राच्‍या दिशेने असून, हे बांधकाम भरतीरेषेपासून 200 मीटर्सच्या आत आहे. ते सीआरझेड-3 मध्ये येते. हे बेकायदा बांधकाम अधिकृत बांधकामाचाच भाग असल्याचा युक्तिवाद करून संभ्रम निर्माण करण्‍यात आला होता. मात्र खंडपीठाने हे सर्व दावे खोडून काढले आहेत. हे अनधिकृत बांधकाम पूर्वपरवानगी न घेता उभारल्याने त्यामागील उद्देश स्‍पष्‍ट होत आहे. सरकारी यंत्रणेनेही त्‍याविरोधात कारवाई करण्‍यास विलंब केला. क्लबमध्ये बार व रेस्टॉरंट सुरू असूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असे निरीक्षण खंडपीठाने सरकारी खात्यांवरही ताशेरे ओढत नोंद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com