Mopa Airport: आक्रमक पवित्र्यामुळे ‘मोपा’वरील टॅक्सी पार्किंग दरवाढ मागे

Mopa Airport Parking Fee: ‘जीएमआर’चे नमते; आमदारांची मध्‍यस्‍थी
Mopa Airport Parking Fee: ‘जीएमआर’चे नमते; आमदारांची मध्‍यस्‍थी
Mopa Airport Taxi DriverDainik Gomantak
Published on
Updated on

मोपा विमानतळावर ‘जीएमआर’ कंपनीने कालपासून टॅक्सी पार्किंगसाठी ८० ऐवजी २०० रुपयांची केलेली दरवाढ आक्रमक पवित्र्यामुळे मागे घेतली. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या प्रकरणी यशस्‍वी मध्‍यस्‍थी करताना कंपनीशी बोलणी केली. तसेच टॅक्सीचालकांच्‍या इतर मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून त्‍या सोडविण्याचा प्रयत्न करेन, असे सांगितले.

‘मोपा’वरील सर्व टॅक्सीचालक आज सकाळी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या धारगळ येथील निवासस्थानी गेले व त्‍यांनी कंपनीशी चर्चा करून वाढीव शुल्‍क मागे घेण्‍याची विनंती केली. हे संतप्‍त टॅक्सीचालक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात होते. त्‍यामुळे मोपा विमानतळ गेटच्या परिसरात पोलिसांची मोठी कुमक आणून ठेवण्‍यात आली होती.

यावेळी शिव वॉरियर्स टॅक्सी युनायटेड टॅक्सी ब्रदर्स संघटनेचे अध्यक्ष रामा वारंग, खजिनदार निखिल महाले, अभिषेक तोरसकर, सचिव भरत वरक, माजी जिल्हा पंचायत सदस्‍य प्रदीप पटेकर आणि टॅक्‍सीचालक उपस्‍थित होते.

Mopa Airport Parking Fee: ‘जीएमआर’चे नमते; आमदारांची मध्‍यस्‍थी
Mopa Airport: पार्किंग शुल्क वाढीवरुन टॅक्सी चालक संतप्त, मोपावर तणाव; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

विमानतळाच्‍या गेटवर वातावरण बनले तंग

विमानतळाच्या गेटवर आल्यावर टॅक्सीचालकांना अडविण्यात आले. यावेळी तेथे बाचाबाची झाली. त्‍यामुळे काही वेळ वातावरण तंग बनले. जीएमआर कंपनी तसेच कंपनीचे चिफ एक्झुकेटिव्ह आर. व्ही. सेशन यांच्याविरोधात टॅक्‍सीचालकांनी जोरदार घोषणा देण्यास सुरूवात केली. आमदार आर्लेकर यांनी टॅक्सीचालकांची बाजू मांडली. त्‍यानंतर सेशन यांनी पूर्वीचाच दर ठेवण्याचे मान्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Shivaji Maharaj Statue Goa High Court Case
IndiGo Goa Delhi Flight Emergency Landing
Mopa Airport Link Highway Toll
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com