पार्किंग शुल्क वाढीवरुन टॅक्सी चालक संतप्त, मोपावर तणाव; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
Manohar International Airport GoaDainik Gomantak

Mopa Airport: पार्किंग शुल्क वाढीवरुन टॅक्सी चालक संतप्त, मोपावर तणाव; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

Mopa Airport Parking Fee: मोपा विमानतळावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंग शुल्कात तब्बल 120 रुपयांनी वाढ केल्याने टॅक्सी चालक आक्रमक झाले आहेत. टॅक्सी चालकांनी सोमवारी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने सतर्क झालेल्या पोलिसांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी आज (मंगळवार) विमानतळाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

उत्तर गोव्यात गेल्या वर्षी सुरु झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरुवातील टॅक्सी चालकांसाठी ८० रुपये पार्किंग शुल्क होते. त्यात सुमारे 150 टक्के वाढ करण्यात आली असून, टॅक्सी चालकांना यासाठी आता २०० रुपये मोजावे लागत आहेत.

यावरुन सोमवारी टॅक्सी चालक चांगलेच संपप्त झाले व त्यांनी शुल्ववाढ मागे घेण्याची मागणी केली. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही, नियमानुसार काय असेल ते करावे आणि टॅक्सी चालकांना न्याय द्यावा, अशी मागणी टॅक्सी चालकांनी केली.

आज (मंगळवार) मोपा विमानतळावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

आमदार प्रविण आर्लेकर मुख्यमंत्र्यांना भेटणार

शुल्क वाढीवरुन संतप्त झालेल्या टॅक्सी चालकांनी पेडण्याचे आमदार प्रविण आर्लेकर यांची भेट घेत त्यांना शुल्कवाढीचा विषय सांगितला. सरकारने यात हस्तक्षेप करुन जीएमआर कंपनीने केलेली शुल्कवाढ मागे घ्यावी अशी विनंती चालकांनी आर्लेकरांकडे केली.

आमदार प्रविण आर्लेकरांनी शुल्क वाढीच्या विषयी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन टॅक्सी चालकांना दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com