GMC: 'जीएमसी'त ज्येष्ठ नागरिकांना मिळणार विनाविलंब सेवा! स्वतंत्र काऊंटरची सुविधा सुरू; आरोग्यमंत्री राणेंनी दिली माहिती

GMC senior citizen services: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी प्रक्रियेत होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र काऊंटर उपलब्‍ध करून देण्‍यात आला आहे
GMC senior citizen services, Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी प्रक्रियेत होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र काऊंटर उपलब्‍ध करून देण्‍यात आला आहे. यामुळे त्यांना वेगाने आणि विनाविलंब वैद्यकीय सेवा मिळणार आहेत.

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले की, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘प्राधान्य कार्ड’ दिले जाईल. यामुळे त्यांना ओपीडी व इतर वैद्यकीय सेवांसाठी प्राधान्य मिळेल. नोंदणीसाठी उभे राहण्याचा त्रास होऊ नये आणि त्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा स्वतंत्र काऊंटर कार्यरत असेल. शिवाय, ज्येष्ठ नागरिकांना मदत मिळावी म्हणून काऊंटरवर सहाय्यक उपस्थित असतील.

GMC senior citizen services, Vishwajit Rane
GMC: 'गोमेकॉ'बाहेरील रस्त्याला फास्टफूड वाहनांचा वेढा! अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी; रुग्णवाहिकांना होतोय अडथळा

ओपीडीमध्ये तपासणी व इतर वैद्यकीय सेवांसाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एक सार्वजनिक संबंध अधिकारी (पीआरओ) देखील तैनात असेल, असे राणे यांनी स्पष्ट केले.

ही नवीन सुविधा सुरू झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यसेवा अधिक सुकर होईल आणि त्यांना दिलासा मिळेल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com