
Tigers In Goa:वाघांच्या संवर्धनाबदल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे ही आजच्या जागतिक व्याघ्र दिनामागची भूमिका आहे. दरवर्षी २९ जुलै रोजी जगभरात वाघांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्याची घोषणा २९ जुलै २०१० रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे करण्यात आली होती, ज्याचा उद्देश जगभरातील वाघांचे संवर्धन आणि व्यवस्थापन विकसित करण्यासाठी सर्व व्याघ्र प्रदेशयुक्त सर्व देशांना एकत्र आणणे हा होता. हा दिवस या भव्य आणि रुबाबदार प्राण्यांसमोरील आव्हाने आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो.
व्याघ्र अभयारण्य हा वाघांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या भक्ष्यांच्या वाढीसाठी उपयुक्त असलेला अधिवास असतो. गेल्या काही वर्षात पश्चिम घाटाच्या गोव्याच्या भागात वाघ आढळून आले आहेत.
2022 मध्ये वनविभागाने गोव्यात सहा वाघांच्या दिसण्याची नोंद केली. केरकर यांच्यासारख्या पर्यावरण तज्ञांच्या मते, एखादे क्षेत्र व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी वाघांची किमान संख्या तेथे असणेही आवश्यक नाही. वाघांना त्यांची शिकार मिळण्यास पुरेसा असलेला कोणताही नैसर्गिक अधिवास व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर केला जाऊ शकतो.
गोव्यातील म्हादई वन्यजीव अभयारण्यात 2020 मध्ये झालेल्या वाघांच्या मृत्यूच्या घटना फार चिंतेच्या होत्या. राज्यात व्याघ्र प्रकल्पाची दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी या घटनेमुळे पुन्हा जोरदारपणे रेटली गेली. गोव्याच्या पश्चिम घाटात वाघांना संरक्षण मिळावे यासाठी नेटाने प्रयत्न सुरू झाले आणि अजूनही होत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.