Goa News : कासार समाजाला ओबीसी दर्जा द्या; मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

Goa News : गेल्‍या अनेक वर्षांपासून मागणी आहे प्रलंबित
cm pramod sawant
cm pramod sawant Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa News :

पिसुर्ले, राज्यातील कासार समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या विषयाला चालना देऊन सदर मागणी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करावा अशा मागणीचे निवेदन अखिल गोमंतक त्‍वष्‍टा कासार समाज संस्थेच्या वतीने काल साखळी येथे त्यांची भेट घेऊन सादर करण्यात आले आहे.

हा समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या अजूनही मागासलेला आहे. त्‍यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून या समाजावर अन्याय होत आहे. यासाठी संस्थेच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून प्रयत्न करत आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष महेश तांबट यांनी दिली आहे.

तांबट यांनी सांगितले की, राज्यात कासार समाजाची लोकसंख्या दोन ते अडीच हजारांच्या आसपास आहे. या समाजातील बहुसंख्य लोक अजूनही आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत.

यामुळे सदर समाजावर फार मोठा अन्याय झाला आहे. त्यासाठी राज्यातील ज्ञाती बांधावानी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या अखिल गोमंतक त्‍वष्‍टा कासार समाज संस्थेच्या वतीने २०१५ साली गोवा राज्य ओबीसी व अनुसूचित जाती आयोगाकडे कासार समाजाला ओबीसीचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री सावंत यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी संस्थेचे सचिव दिवाकर सावंत, सदस्य ॲड. महेंद्र एकावडे उपस्थित होते.

cm pramod sawant
Shripad Naik: MP श्रीपाद नाईकांना CM व्हायचंय? पत्रकाराच्या प्रश्नावर म्हणाले नशिबात असेल तर...

सर्वेक्षणानंतर पूर्ण अहवाल सादर

मागणीचे निवेदन सादर केल्यानंतर आयोगाच्या निर्देशानुसार संस्थेच्या वतीने राज्यातील कासार समाजाचे सर्वेक्षण करून पूर्ण अहवाल सादर करण्यात आला आहे. परंतु सदर विषयावर अद्याप कोणतीही निर्णय झाला नसल्याने समाजाच्या सर्वांगीण विकासावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारने यापुढे वेळ न दवडता त्वरित या विषयाला चालना देऊन कासार समाजाला न्याय द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे, असे तांबट यांनी सांगितले.

राज्यात कासार समाजाची लोकसंख्या दोन ते अडीच हजारांच्या आसपास आहे. या समाजातील बहुसंख्य लोक अजूनही आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत. या समाजावर आतापर्यंत फार मोठा अन्याय झाला आहे.

- महेश तांबट, उपाध्‍यक्ष (गोमंतक त्‍वष्‍टा कासार समाज संस्था)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa 1200 Representatives Asset Declaration
Bhandari Community Goa Chief Minister
Goa High Court Illegal Construction
Goa Bhandari Community Politics
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com