Goa Politics: रोजगारात स्थानिकांना 80 टक्के आरक्षण द्या

Goa Politics: कांदोळकर: विधेयकाला सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा हवा
Vijai Sardesai on Salary Certificate
Vijai Sardesai on Salary CertificateDainik Gomantak

Goa Politics: राज्यातील उद्योग क्षेत्रात स्थानिक गोमंतकीय युवांसाठी 80 टक्के आरक्षण असावे, अशा आशयाचे खासगी सदस्य विधेयक फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधासभेत मांडले आहे. येत्या शुक्रवारी हे विधेयक सादर होणार आहे.

त्यामुळे सर्व चाळीस आमदारांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या विधेयकास पाठिंबा देत ते मंजूर करून घ्यावे, असे आवाहन थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकरांनी केले. हे विधेयक विधानसभेत आणल्याबद्दल कांदोळकरांनी सरदेसाईंचे अभिनंदन केले. मंगळवारी (ता.६) सायंकाळी उशिरा ते म्हापशात माध्यमांशी बोलत होते.

किरण कांदोळकर म्हणाले, सध्या राज्यात बेरोजगाराची प्रश्न मोठा असून, आमदार विजय सरदेसाई यांनी आणलेले हे विधेयक गोव्यातील युवकांसाठी खूप महत्त्वाचे ठरेल. कारण, उद्योग कंपनीत स्थानिक मुलांना संधी दिली जात नाही. परंतु, हे विधेयक मंजूर झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

Vijai Sardesai on Salary Certificate
PM Narendra Modi: शैक्षणिक, पर्यटन हबची ‘गॅरंटी’!

तसेच उद्योग कंपनीत ८०टक्के गोमंतकीय मुलांना नोकरी देणे अनिवार्य केल्यास अनेकांना उदारनिवार्ह मिळेल, असेही ते म्हणाले.

सध्या गोव्यातील खासगी उद्योग कंपनीत जवळपास ४९टक्के गोमंतकीय मुले कामाला आहेत. परंतु, ८०टक्के गोमंतकीयांना मुलांना कंपनीत घेण्याचा कायदा मंजूर झाल्यास त्याचा फायदा स्थानिक युवकांना होईल.

Vijai Sardesai on Salary Certificate
Goa Medical College: ब्रेन डेड रुग्णाच्या दानाने दोघांना नवसंजीवनी

अशावेळी विधानसभेत हे विधेयक येताच, सर्व आमदारांनी कुठलेही राजकारण किंवा भेदभाव न करता या विधेयकास पाठिंबा द्यावा व मुलांच्या भविष्याचा विचार करावा, असे आवाहन कांदोळकरांनी केले.

अस्नोडा ते मुळगावमधील बायपास रस्त्याचा प्रश्न खितपत पडलाय. या कामासंदर्भात सर्व कायदेशीर प्रक्रिया व सोपस्कार पूर्ण झाले असून पाठपुराव्याची आवश्यकता आहे. सध्या डबल इंजिनचे सरकार असून, स्थानिक आमदारांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. परंतु, आमदार हे अकार्यक्षम असल्यानेच या कामास विलंब होतोय, अशी टीका त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com