Amit Palekar
Amit Palekar Dainik Gomantak

Goa AAP: ‘त्या’ दिव्यांगाच्या कुटुंबीयांना 50 लाख द्या

Goa AAP: ‘आप’ : घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची समाज कल्याण खात्याकडे मागणी

Goa AAP: पर्वरीतील संजय स्कूल व्होकेशनल सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरून मृत्यू पावलेल्या दिव्यांग विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना 50 लाखांची नुकसान भरपाई द्यावी आणि या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने केली आहे.

Amit Palekar
Iskcon Temple Ponda: ‘इस्कॉन मंदिर’ रस्ताविरोधी याचिकांवर सुनावणी पूर्ण

समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात ॲड. अमित पालेकर, वाल्मिकी नाईक, ॲड. सुरेल तिळवे, वाल्मिकी नाईक, उपेंद्र गावकर यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी होते. या शिष्टमंडळाने समाज कल्याण खात्याच्या पणजी कार्यालयावर धडक देत खात्याचे संचालक पंचवाडकर यांची भेट घेतली. या मुलाच्या कुटुंबीयांना सानुग्रह आर्थिक मदत देऊन या प्रकरणाची चौकशी करावी,अशी मागणी केली.

आपचे नेते वाल्मिकी नाईक म्हणाले, पर्वरी येथील एससीईआरटीच्या जुन्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दिव्यांगांसाठी असलेले संजय स्कूल अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे. यासाठी राज्य दिव्यांग आयोगाने उत्तर गोवा जिल्हाधिकारी, संजय स्कूल व शिक्षण खात्याला पत्रव्यवहार सुध्दा केला होता. परंतु त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा हा बळी आहे. सर्व सरकारी इमारतींची दुरुस्ती हाती घेतली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने जाहीर केले होते. तरीही या इमारतीकडे का दुर्लक्ष केले? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

Amit Palekar
Girish Chodankar: जमीन घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा

सरकारने लक्ष द्यावे

  • सरकारी कार्यालये आणि संजय स्कूल व्होकेशनल सेंटर प्रवेशायोग्य आणि सुरक्षित इमारतीत स्थलांतरित करा

  • पीडित कुटुंबाला 50 लाखांची तात्काळ भरपाई

  • सरकारी निष्काळजीपणामुळे घडलेल्या दुःखद घटनेची उच्चस्तरीय चौकशी

  • सर्व सरकारी कार्यालये, शिक्षण संस्था, सार्वजनिक इमारती, खासगी इमारती यांचे ऑडिट लवकरात लवकर करावे.

पर्पल फेस्टसाठी ७ कोटी

पर्पल फेस्टची संकल्पना मांडण्यात आली, तेव्हा अंदाजे प्रस्तावित खर्च १.५ कोटी होता. तथापि, गोवा मनोरंजन संस्था सोबत झालेल्या बैठकीनंतर खर्च ३.५ कोटींवर गेला. त्यानंतर, ५.५ कोटींसाठी निविदा जारी करण्यात आली, शेवटी परिणामी उत्सवासाठी ७.५ कोटी खर्च करण्यात आला. सरकारने ७ कोटी रुपये सजावट, ब्रँडिंग आणि व्हीआयपीवर खर्च केला. पण परंतु ७ हजार रुपयांत होणारी रेलिंग दुरुस्तीही अद्याप झालेली नाही, असा आरोप नाईक यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com