गोव्यातील नशेबाज पोलिसांकडून मुलींना मारहाण

संतापजनक प्रकार: कोलवाळ स्थानकात तक्रार घेण्यास नकार
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: म्हापसा येथील जिल्हा इस्पितळातून उपचार घेऊन एका मुलासोबत दुचाकीने घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना अडवून नशेतील पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोलवाळ येथे घडला. याप्रकरणी एका मुलीच्या आईने कोलवाळ पोलिस स्थानकात रविवारी सकाळी तक्रार दाखल करण्यास गेली असता ती नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुली दहावीची

Goa Crime News
मंत्रिपदासाठी पेडणेवासीय आक्रमक

परीक्षा पुढील आठवड्यापासून देणार आहेत. त्यापैकी एका मुलीला फ्रॅक्चर झाल्याने व वेदना असह्य झाल्याने ती रात्रीच्यावेळी आपल्या मैत्रिणीला घेऊन जिल्हा इस्पितळात गेली. सोबत एका मुलीचा चुलत भाऊ दुचाकी चालवत होता. इस्पितळात जाऊन ते घरी परतत असताना गस्तीवर असलेल्या वाहनातील पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्यावर अनेक प्रश्‍नांचा भडिमार केला. पोलिसांना सत्यपरिस्थिती सांगूनही ते ऐकण्यास तयार नव्हते. नशेमध्ये व गणवेषात नसलेल्या पोलिसांनी या मुलींसोबत असलेल्या मुलाला बेदम मारहाण करण्यात सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या मुलीने आपल्या चुलत भावाला बोलावले असता त्यालाही पोलिसांनी मारहाण केली. मुलींनी महिला पोलिस कुठे आहे असा प्रश्‍न केला असता त्या दोघा मुलींनाही मारहाण केली व काही वेळातच ‘पिंक फोर्स’ वाहन तेथे आले.

‘पिंक फोर्स’मध्ये या मुलींना बसवण्याऐवजी त्यांना गस्तीवरील पोलिस वाहनात बसवण्यात आले तर स्वतः पोलिस पिंक फोर्स वाहनामध्ये बसले. या मुलींनी त्यांना पोलिस स्थानकात नेण्याची विनंती केली मात्र नशेमध्ये असलेले हे पोलिस काहीच ऐकण्यात तयार नव्हते. त्यांंना मुलाच्या घरी नेण्यात आले व या मुलींना त्याची आई ओळखते की नाही याची चौकशी करू लागले. मुलाच्या आईने एका मुलीला ओळखले व दुसरी तिची मैत्रीण असल्याने ती ओळखू शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी तिच्या समोरच मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही मुलींना त्यांच्या घरी नेले. हात फ्रॅक्चर झालेल्या मुलीला पोलिसांनी तिच्या पालकांसमोर मारहाण केली. यासंदर्भात तिच्या आईने पोलिसांना जाब विचारला.

या मुलींसोबत असलेला मुलगा हा त्या मुलींचा प्रियकर असल्याचा तसेच मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर फिरत असल्याचा दावा करत होते. बाल हक्काचे संरक्षण करण्याऐवजी ते मानवी हक्काचे उल्लंघन करत होते. कोलवाळच्या पोलिस अधिकाऱ्याने जप्त केलेली त्या मुलाची दुचाकी महिलेला परत केली. मुलींची दहावीची परीक्षा येत्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याने त्यात अडथळा येऊ नये म्हणून महिलेने तक्रार दाखल करण्यासंदर्भातचा निर्णय तूर्त घेतला नाही. या प्रकरणाची दखल काही बिगर सरकारी संस्थांनी घेऊन या घटनेविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांकडून रात्रीच्या सुमारास संशयावरून सतावणूक करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. पोलिसांच्या बेशिस्त वागणुकीमुळे गेल्या काही दिवसांत कारवाई झाली तरी त्यात सुधारणा होत नसल्याने समाजात संताप व्यक्त होत आहे.

Goa Crime News
Goa News: सरकारी कामांसाठी 25 टक्के कमिशन!

अधिकाऱ्याकडून माफीनामा

आज सकाळी फ्रॅक्चर असलेल्या मुलीची तक्रार देण्यास म्हापसा पोलिस स्थानकात गेली. घटना कोलवाळ हद्दीत घडल्याने तिला त्या पोलिस स्थानकावर पाठवण्यात आले. मात्र, तेथे कारवाई केलेल्या पोलिस अधिकाऱ्याने घटनेबाबत माफी मागून तक्रार न देण्याची विनवणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com