'ही धूळफेक ठरू नये...'; निवड आयोगाकडून भरतीच्या निर्णयावर चोडणकर, बोरकरांनी सुनावले खडे बोल

Goa staff selection commission recruitment: नोकऱ्यांचा काळाबाजार उघडकीस आल्‍यानंतर राज्‍य सरकारने घेतलेल्‍या भूमिकेचा बहुतांश विरोधकांनी समाचार घेतला आहे. गिरीश चोडणकर म्‍हणाले ते उशिरा सुचलेले शहाणपण आहे.
Girish Chodankar
Girish ChodankarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa staff selection commission recruitment decision over cash for job scam viresh borkar girish chodankar reaction

पणजी: नोकऱ्यांचा काळाबाजार उघडकीस आल्‍यानंतर राज्‍य सरकारने घेतलेल्‍या भूमिकेचा बहुतांश विरोधकांनी समाचार घेतला आहे.

गिरीश चोडणकर म्‍हणाले, कर्मचारी निवड आयोगाच्या वतीने सरकारने भरती करण्याचा जो निर्णय घेतला आहे, ते उशिरा सुचलेले शहाणपण आहे. सर्व स्तरांतून दबाव निर्माण होत असल्याचे पाहूनच सरकार भानावर आले आहे.

काँग्रेसने नोकर घोटाळ्याविषयीचा आवाज दिल्लीपर्यंत नेल्यामुळे भाजपला आता कर्मचारी निवड आयोगाची आठवण झाली आहे. आयोग स्थापन करून एक वर्ष झाले तरी त्याकडे दुर्लक्ष झाले आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यात नोकर भरती घोटाळा झाला, असे म्हणता येईल. परंतु नोकर भरतीचा घेतलेला निर्णय ही धूळफेक ठरू नये.

आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनीही प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली आहे. ते म्‍हणतात, सरकारने आता कर्मचारी निवड आयोगातर्फे नोकर भरतीचा निर्णय घेतला असला, तरी त्यांच्या या निर्णयावर विश्वास नाही. याआधी सरकारने अशा जाहिराती काढून नंतर त्या स्थगित केल्या आहेत. कर्मचारी निवड आयोग स्थापन झाल्यापासून सरकार केवळ जाहिरातीच काढत आहे. नंतर आम्ही विभागामार्फत नोकरभरती करणार, असाही निर्णय जाहीर करते.

Girish Chodankar
Cash For Job: पोलिस भाजपचे प्रवक्‍ते आहेत का? युरी, सरदेसाईंचा संताप; उच्‍चस्‍तरीय चौकशीवर बाबूशही ठाम

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आहे हे स्पष्ट दिसत आहे. तरीदेखील सरकार गप्प आहे. या प्रकरणाचा योग्य तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन चौकशी करावी, असेही वीरेश बोरकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com