GIM Student Attack: जीआयएम हॉस्टेलमध्ये कोयता-चाकूने जीवघेणा हल्ला; 24 वर्षीय विद्यार्थिनीचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

Sukanya Sabani bail rejected: जीवघेणा हल्ला करणारी २४ वर्षीय संशयित विद्यार्थिनी सुकन्या सबानी हिचा जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
GIM Student Attack
GIM Student AttackDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (जीआयएम), पर्ये येथील वसतिगृहात सोबत राहणाऱ्या विद्यार्थिनीवर कोयता आणि चाकूने जीवघेणा हल्ला करणारी २४ वर्षीय संशयित विद्यार्थिनी सुकन्या सबानी हिचा जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

तक्रारीनुसार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ही घटना जीआयएम पर्ये परिसरातील वसतिगृह क्र. २ मधील खोलीमध्ये घडली. वसतिगृहातील दुसऱ्या खोलीत राहणारी सुकन्या हिने लखनौ येथील २५ वर्षीय विद्यार्थिनी तिच्या खोलीत झोपलेली असताना अचानक आत प्रवेश केला.

तिने धारदार चाकूने पीडित विद्यार्थिनीच्या मानेवर वार केले, ज्यामुळे गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव देखील झाला. हल्ल्यानंतर संशयित सुकन्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

GIM Student Attack
Goa Politics: फक्त निवडणुका आल्यावर यात्रा काढून उपयोग नाही! 'भाजप जनतेसोबत' म्हणत दामू नाईकांचा काँग्रेसला सणसणीत टोला

न्यायालयाने स्पष्ट केले की, पीडित विद्यार्थिनीच्या शरीरावर एकूण चार गंभीर जखमा आढळल्या आहेत. यात जबड्याच्या वर मानेवर झालेल्या गंभीर जखमेचा देखील समावेश आहे. तसेच हाताच्या बोटांवर तीन ठिकाणी कापल्याच्या जखमा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com