गणेश चतुर्थीनिमित्त ख्रिश्चन बांधवांकडून हिंदूंना भेटी

उतोर्ड्यात ख्रिश्‍चनांकडून हिंदूना भेटवस्तू प्रदान
Salcete
Salcete Dainik Gomantak

फातोर्डा: गोव्यात सर्वधर्म समभाव अस्तित्वात असल्याची प्रचिती वेळोवेळी येत असते, या राज्यात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असतात, अशीच परंपरा जपली आहे. सासष्टीतील उतोर्डा येथील ख्रिश्‍चन बांधवांनी गणेशचतुर्थीच्या निमित्ताने दरवर्षी येथील ख्रिश्‍चन बांधव स्थानिक हिंदू बांधवांना सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भेट वस्तू देण्याची परंपरा जोपासत आहेत.

(Gifts from Christian brothers to Hindus at Salcete on the occasion of Ganesh Chaturthi)

Salcete
गणरायाच्या आगमणाला वरुणराजा ही लावणार हजेरी, IMD ने वर्तवली शक्यता

युनायटेड क्लब ऑफ उतोर्डाचे अध्यक्ष रेमी परेरा व त्यांचे स्थानिक सहकारी गणेश चतुर्थीच्या दोन दिवसापूर्वी उतोर्डा परिसरातील हिंदू बांधवांच्या घरी भेट देऊन त्यांना भेटवस्तू प्रदान करीत असतात. ख्रिश्‍चन बांधवांकडून देण्यात येणारी भेट येथील हिंदू बांधव हसतमुखाने स्वीकार करीत असतात. तसेच येथील हिंदू बांधवही ख्रिश्‍चन बांधवांच्या ख्रिसमस सणाला न चुकता सहभागी होऊनआपले नाते जोपासत असतात.

Salcete
Goa Update: राज्यात कोरोनाचे 150 नवे रुग्ण; बळींची संख्या मात्र शून्यावर

ही परंपरा येथे मागील कित्येक वर्षांपासून सुरु आहे. ख्रिश्‍चन बांधवांकडून हिंदू बांधवांना देण्यात येणाऱ्या भेट वस्तूत माटोळीच्या फळांचा, भाजीपाल्याच्या सामानाचा समावेश असतो. यावर बोलताना रेमी म्हणाले, आम्ही राज्यात सर्वधर्म समभाव व एकता राखण्यासाठी आम्ही ही परंपरा जोपासत आहोत. एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन यापुढेही हे कार्य असेच सुरु ठेवणार असल्याचे रेमी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com