Bike Sent by Train not reached prayagraj since nine days
Bike Sent by Train not reached prayagraj since nine days Dainik Gomantak

प्रयागराज, पाटणा, गोवा पुन्हा पाटणा; गिफ्ट नऊ दिवसांपासून काढतंय चक्कर, लग्नही उरकले पण... रेल्वेचा अजब कारभार

नऊ दिवसांपासून तरूणाची बाईक इकडे तिकडे फिरत आहे आणि प्रयागराजला कधी पोहोचणार याचे पूर्ण उत्तर अद्याप मिळालेले नाही.

Gift Sent by Train not reached prayagraj since nine days: रेल्वे प्रशासनाचा सावळा गोंधळ एका घटनेतून समोर आला आहे. बहिणीच्या लग्नाला गिफ्ट देण्यासाठी तरुणाने मुंबईहून प्रयागराज येथे ट्रेनने बाईक पाठवली. पण बाईक प्रयागराजऐवजी पाटणा येथे पोहोचली, तक्रारीनंतर ती प्रयागराजऐवजी गोव्यातील वास्को द गामा रेल्वे स्थानकावर नेण्यात आली. पुन्हा ती गोव्यातून प्रयागराजऐवजी पाटणा येथे पोहोचली आहे.

तोपर्यंत तरुणाच्या बहिणीचे लग्नही पार पडले. नऊ दिवसांपासून तरूणाची बाईक इकडे तिकडे फिरत आहे आणि प्रयागराजला कधी पोहोचणार याचे पूर्ण उत्तर अद्याप मिळालेले नाही.

मांडा येथील रहिवासी रामलाल यादव यांच्या मुलीचे 17 मे रोजी लग्न होते. मुंबईत काम करणाऱ्या त्यांच्या मुलाने आपल्या बहिणीला भेट देण्यासाठी रेल्वेच्या पार्सल सेवेअंतर्गत 13,202 मुंबई जनता एक्सप्रेसमध्ये बाइक बुक केली.

11 मे रोजी बाईक ट्रेनने प्रयागराज छिवकी येथे पाठवण्यात आली होती, मात्र 12 मे रोजी येथे बाईक उतरवण्यात आली नाही. ट्रेनचा शेवटचा थांबा पाटण्यातील राजेंद्र नगर होता, त्यामुळे बाईक तिथे पोहोचली. तरुणाचे वडील रामलाल सकाळी छिवकी येथे पोहोचले तेव्हा त्यांना बाईक पाटण्याला पोहोचली असे सांगण्यात आले.

Bike Sent by Train not reached prayagraj since nine days
Bike Sent by Train not reached prayagraj since nine days Dainik Gomantak
Bike Sent by Train not reached prayagraj since nine days
Amthane Dam: धक्कादायक! आमठाणे येथे मगरीने महिलेला खेचले धरणात, महिलेचा मृत्यू

दरम्यान, बाईक 13 मे, शनिवार, 12742 पाटणा-वास्को द गामा एक्स्प्रेसने संध्याकाळी येईल, असे त्यांना सांगण्यात आले. म्हणून, रामलाल पुन्हा एकदा छिवकीला पोहोचले, पण त्यांना बाईक मिळाली नाही. त्यांचा मुलगा रामकुमार याला दुचाकी वास्को द गामा येथे पोहोचल्याची माहिती मिळाली. आता ती शुक्रवारी त्याच ट्रेनने प्रयागराज छिवकी येथे येणार आहे. असे त्यांना सांगितले.

शुक्रवारी सकाळी रामलाल तिसऱ्यांदा छिवकी येथे पोहोचले. पहाटे 4.45 ला ट्रेन आली, तीन मिनिटांच्या थांब्यामुळे पुन्हा एकदा इथे बाईक उतरवता आली नाही तिने पाटणा गाठले. रेल्वेच्या या निष्काळजीपणाची रामकुमार यांनी ट्विटद्वारे रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

दरम्यान, बहिणीच्या लग्नात गिफ्ट देण्यासाठी पाठवलेली बाईक तिचे लग्न झाले तरी मिळाली नाही, त्यामुळे रामकुमार यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com