National Games 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही रंग, तरंग आणि रोमांचाने भरलेली आहे. गोव्याची हवाच तशी खास आहे, असे भावनिक उद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उद्घाटन केले. त्यांनी स्पर्धेच्या शानदार आयोजनाबद्दल गोव्याची पाठ थोपटतानाच गोवा हे जागतिक परिषद, बैठकांसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून केंद्र सरकार विकसित करत आहे.
असे जाहीर केले. जी - २० परिषदेत ठरवलेला शाश्वत पर्यटनासाठी गोवा नकाशा हा सर्वांनी एकमताने स्वीकारला आहे ही गोव्यासाठी भूषणावह बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. १ नोव्हेंबरपासून ‘माझा भारत’ ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यानिमित्ताने केली.
खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये युवांचा भरणा मोठा होता. त्यामुळे पंतप्रधानांचे भाषण हे युवा केंद्रित होते. युवांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी केंद्र सरकार टाकत असलेल्या पावलांची माहिती त्यांनी देतानाच सर्वांना उज्ज्वल भवितव्याची खात्री ही आपली खात्री (मोदी की गॅरंटी) असल्याचेही त्यांनी नमूद केले. क्रीडा क्षेत्रात नवे उच्चांक प्रस्थापित कराल ना? अशी विचारणाही त्यांनी केली. त्याला ‘हो...’ असे जोरदार उत्तर स्टेडियममधून मिळाले. पान ४ वर
ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेच्या बैठकीचे एक सत्र देशात झाले, तेव्हा भारत २०३० मध्ये युवा ऑलिंपिक, तर २०३६ मध्ये ऑलिंपिकचे आयोजन करण्यास तयार असल्याचे मी त्यांना सांगितले आहे. हा विषय भावनेपुरता मर्यादित नाही. ठोस कारणे त्यामागे आहेत. १३ वर्षांनंतर भारत हा जगातील मोजक्या आर्थिक ताकदीपैकी एक असेल. एक समृद्ध मध्यमवर्ग देशात असेल. क्रीडा क्षेत्रापासून अवकाशापर्यंत तिरंगा मानाने फडकत असेल. त्यासाठी १०० लाख कोटी रुपये खर्चून सुविधा विकासाची सरकारची तयारी आहे.
ते म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात भारत विकसित होत आहे. युवा हा विकासाच्या केंद्रस्थानी आहे. अभूतपूर्व असा आत्मविश्वास युवा वर्गाकडे आहे. युवा हीच विकसित भारताची शक्ती असेल. ३१ ऑक्टोबरला एकता दिवशी ‘एकतेसाठी धावा’ याचे आयोजन केले जाते. त्याचे भव्य आयोजन गोव्यातही व्हावे. संकल्प आणि प्रयत्न विराट आहे. आशा, आकांक्षा बुलंद आहेत. त्या जोरावरच देश नकारात्मक मानसिकतेतून बाहेर येत सकारात्मक मानसिकतेत शिरून पुढे जात राहणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.