Vishwajeet Rane: चांगल्या आरोग्य सेवेसाठीच खासगी वैद्यकीय महाविद्यालय

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे: जिल्‍हा इस्‍पितळाची स्‍थिती सुधारणार
Health Minister Vishwajeet Rane:
Health Minister Vishwajeet Rane:Dainik Gomantak

Health Minister Vishwajeet Rane: दक्षिण गाेवा जिल्‍हा इस्‍पितळ इमारतीत खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्‍यास विरोधकांचा विरोध असताना या प्रकल्‍पात हे खासगी महाविद्यालय सुरू होणारच हे आरोग्‍यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज स्‍पष्‍ट केले आहे.

Health Minister Vishwajeet Rane:
Panjim Road Condition: राज्यातील रस्ते खड्डेमय, धुळीमुळे नागरिक त्रास्त

गोव्‍यातील रुग्‍णांना चांगली आरोग्‍य सेवा मिळावी यासाठीच हे महाविद्यालय सुरू होत आहे. मडगावातील जिल्‍हा इस्‍पितळ या महाविद्यालयाशी जाेडण्‍यात येणार आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात चांगल्‍या आणि अत्‍याधुनिक सुविधा प्राप्‍त व्‍हाव्‍यात यासाठी सरकारचे प्रयत्‍न सुरू आहेत. या इस्‍पितळात परिपूर्ण हृदयरोग उपचार विभाग सुरू होणार आहे. सरकारने ज्‍याप्रमाणे नियोजन केले आहे, त्‍यानुसारच ही कामे होत आहेत. आपल्‍यावर जे टीका करतात, ते टीका करण्‍यास मोकळे आहेत. मात्र, येत्‍या साडेतीन वर्षांत गोव्‍यातील आराेग्‍य व्‍यवस्‍थेत लक्षणीय बदल करण्‍यासाठीच आपले काम सुरू आहे, असे त्‍यांनी सांगितले.

‘चांगल्या अंगणवाड्या बांधणे शक्य’

केंद्र सरकारने अंगणवाडीसाठीचा भाड्याने जागा घेण्‍यासाठी एक रक्‍कम ठरविली आहे. त्‍या रक्‍कमेतच या अंगणवाड्या चालवाव्‍या लागतात. त्‍यामुळे त्‍या चांगल्‍या इमारतीत चालविता येत नाहीत.

मात्र, यावर उपाय म्‍हणून खात्‍याअंतर्गत एक प्रतिष्‍ठान स्‍थापन करून सीएसआर फंडातून येणाऱ्या पैशांतून चांगल्‍या अंगणवाड्या बांधता येेणे शक्‍य आहे का यावर विचार चालू आहे. अशा पाच अंगणवाड्या बांधण्‍याचे काम सुरूही झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com