Goa Ganesh Festival: सत्तरी तालुक्‍यात ऐकू येतोय आरत्यांचा गजर

संस्‍कृती संवर्धन : युवक-युवतींचा घुमटवादनात पुढाकार; श्रावण महिन्‍यात उत्‍साह शिगेला
Goa Ganesh Festival
Goa Ganesh FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

पद्माकर केळकर

श्रावण महिन्यात विविध देवस्‍थानांमध्‍ये सोमवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येते. सत्तरी तालुकाही त्‍यास अपवाद नाही. सध्‍या तालुक्‍यात उत्‍साह असून भक्तिमय, मंगलमय वातावरण दिसून येत आहे. सर्वत्र पारंपरिक आरत्‍यांचा गजर ऐकू येत असून, त्‍यात युवकांबरोबरच युवतीही मोठ्या संख्‍येने सहभागी होत असल्‍याचे दिसून येत आहे.

Goa Ganesh Festival
Loksabha Election: श्रीपाद नाईक यांचा प्रचाराला आरंभ

राज्‍यात हिंदूंचा सर्वांत महत्त्‍वाचा सण म्‍हणजे गणेश चतुर्शी. त्या उत्सव तोंडावर आला आहे. पण त्‍यापूर्वी सध्‍या सुरू असलेल्‍या श्रावण महिन्यात तबला, पेटी, टाळ यांच्या माध्यमातून पारंपरिक भजन, घुमट आरत्‍या सुरू असल्‍याचे दिसून येत आहे. घुमट आरतीला विशेष महत्त्‍व आहे. गावागावांत पुरुष मंडळींकडून घुमट आरत्‍या सादर केल्या जातात. पण कालांतराने त्यात बदल घडत आहेत. आता युवती, महिला देखील पुढे सरसावल्या आहेत. त्याद्वारे पारंपरिक घुमट आरतीचे संवर्धन होत आहे.

नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे येथील श्री सातेरी शांतादुर्गा मंदिरात काल शुक्रवारी रात्री युवक, युवती, महिलांनी तब्बल दोन-अडीच तास सुरेल आवाजात, अगदी तल्लीन होऊन घुमटाच्या तालावर विविध आरत्यांचे सुरेख सादरीकरण केले. धावेबरोबरच नगरगाव, आंबेडे, ब्रह्माकरमळी, वाळपई, कोपार्डे अशा अनेक गावांतही घुमट आरती, भजनांचा गजर ऐकू येतोय.

Goa Ganesh Festival
Vegetables in Goa: राज्यात भाजीपाल्याची आवक वाढली

युवकांबरोबरच युवतींचेही कौतुक करावे तेवढे थोडेच. गावातील युवा-युवतींनी, महिलांनी याआधी घुमट आरतींचे प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे आज त्या चांगल्या प्रकारे घुमट आरती सादरीकरण करीत आहेत. त्‍याद्वारे घुमट आरतींची परंपरा जतन होण्यास मदत होतेय. गावात दर शुक्रवारी आरत्‍यांचा गजर कानी पडतो व त्‍यामुळे मन प्रसन्न होते.

- दशरथ गावकर, धावे

आमच्‍या गावातील श्री शांतादुर्गा मंदिरात दर शुक्रवारी घुमट आरती सादर केली जाते. त्यात युवापिढी मोठ्या उत्साहाने सहभागी होते आहे. गेल्या वर्षी आम्ही मंदिरात घुमट आरतींचे प्रशिक्षण घेतले. त्यातून आम्हाला शास्त्रशुद्ध वादनाचे धडे मिळाले. त्याचा फायदा आता कला-संस्‍कृती संवर्धनासाठी होत आहे. घुमट वादन ही कला जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

- पूर्वा मांद्रेकर, धावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com