Ghumat Aarti: डिचोली परिसरात घुमू लागला घुमटांचा निनाद

लगबग सुरु: बालगोपाळांकडून विशेष आरती सादरीकरणाची तयारी सुरू
Ghumat Aarti
Ghumat AartiDainik Gomantak

Ghumat Aarti: राज्यात चतुर्थीची लगबग सुरू झाली आहे. बाजारही सजू लागले आहेत. चतुर्थी काळात गावोगावी वाड्यावाड्यावर आरती वा हौशी मंडळांकडून तसेच बालगोपाळांकडून गणपती बाप्पांसमोर घुमट आरती सादर करण्यात येतात. गणपती विसर्जन करीपर्यंत सर्वत्र दिवसरात्र घुमटांचा बाज कानी पडत असतो. घुमट आरत्यांमुळे ‘चवथी’च्या मंगलमय वातावरणातही भर पडत असते.

Ghumat Aarti
Building Construction Fee: राज्यात बांधकाम पर्यावरण परवाना शुल्कात मोठी वाढ

चतुर्थी काळात घरोघरी घुमट आरत्यांचा गजर कानी पडत असतो.सर्वण येथे तर बालगोपाळांनी घुमट आरत्यांचा सराव सुरू केला आहे. गेल्या एक महिन्यांपासून आमचा सराव सुरू आहे. कधी एकदाचे मंगलमूर्ती गणरायाचे आगमन होते आणि आरती करायला मिळते. त्याची उत्सुकता लागून राहिली आहे, असे सर्वणमधील बालगोपाळांनी सांगितले.

Ghumat Aarti
Varsha Usgaonkar: मातृभाषा हीच सर्वश्रेष्ठ भाषा

सर्वणमध्ये बालकलाकारांचा सराव

चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सध्या डिचोलीतील काही भागात घुमट आरत्यांचा सराव (रियाज) सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या सर्वणसह काही ग्रामीण भागात घुमटांसह समेळ आदी वाद्यांचा निनाद घुमू लागला असून, हळूहळू चतुर्थीच्या वातावरणात भर पडू लागली आहे. घरोघरी गणपती बाप्पासमोर आरत्या ठरलेल्याच आहेत. याशिवाय चतुर्थीनिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घुमट आरत्यांचे कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com