Vijai Sardesai: "गोव्याच्या शहाजहानने अनेक ताजमहाल बांधलेत" रवींद्र भवनाच्या गळतीनंतर सरदेसाईंचा बोचरा वार कोणावर?

Margaon Ravindra Bhavan: गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी या कठीण काळात सर्वांनी सरकार सोबत खंबीरपणे उभं रहाण्याचं आवाहन केलं
 Ravindra Bhavan leak Goa
Ravindra Bhavan leak GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दोन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. या पावसाने राज्यात ठिकठिकाणी पडझड केली आहे, स्थानिकांचे नुकसान झाले आहे. गोमंतकीयांना मदत मिळावी म्हणून सरकार देखील कार्यरत आहे आणि अशात गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी या कठीण काळात सर्वांनी सरकार सोबत खंबीरपणे उभं रहाण्याचं आवाहन केलं आहे.

सरदेसाई म्हणाले की मी सरकारची सर्वात अधिक टीका करतो मात्र यावेळी मी सरकारला धारेवर धरणार नाही. हा अवकाळी पाऊस आहे आणि अशावेळी आपण सर्वांनीच सरकारच्या बाजूने उभं राहण्याची गरज आहे.

 Ravindra Bhavan leak Goa
Margaon News: ..हाच भाजप सरकारचा 'गळका' विकास! विरोधक आक्रमक; 9 महिन्यांपूर्वीच उद्‌घाटन झालेल्या रवींद्र भवनात पाणीच पाणी

ठिकठिकाणी स्थानिकांची मदत करण्यासाठी काम सुरु केलं असल्याचं देखील सरदेसाई यांनी नमूद केलं आहे. येत्या काही दिवसांसाठी गोव्यात पावसामुळे होणाऱ्या पडझडीचं काम करावं लागणार असल्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.

"गोव्यातल्या शहाजहानने अनेक ताज महाल बांधलेत"

अवघ्या नऊ महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात उद्‌घाटन झालेल्या काणकोण येथील रवींद्र भवनाला मंगळवारी (२० मे) मुसळधार पावसामुळे भीषण गळती लागली. यामुळे पहिल्या मजल्यावर असलेल्या कला आणि संस्कृती विभागाच्या ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले, ज्यामुळे हजारो पुस्तके भिजून खराब झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना सादर घटनेबद्दल विचारलं असता त्यांनी विनोदी शैलीत त्यांचं मत मांडलं मात्र याची चर्चा सगळीकडेच होतेय. ते म्हणाले की, "शहाजहानने फक्त एकच ताजमहाल बांधला, पण काणकोण रवींद्र भवनाची स्थिती पाहता असे दिसते की गोव्याच्या शहाजहानने राज्यात अनेक ताजमहाल बांधले आहेत".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com