GFP President Vijai Sardesai support Bhoma Villagers
GFP President Vijai Sardesai support Bhoma VillagersDainik Gomantak

Vijai Sardesai: गोव्याचे मुख्यमंत्री नकली रामभक्त, 'चायनीज प्रॉडक्ट', नो गॅरन्टी, नो वॉरन्टी

गोवा फॉरवर्ड, रेव्होल्युशनरी गोवन्स या दोन्ही पक्षांनी भोमवासीयांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला
Published on

Vijai Sardesai on Bhoma Villagers On Highway Issue: गोवा फॉरवर्ड व रेव्होल्युशनरी गोवन्स या दोन्ही पक्षांनी आज भोमवासीयांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला.

तसेच महामार्ग रद्द होईपर्यंत हा लढा आम्ही लढणार. शेवटच्या श्वासापर्यंत ही लढाई लढू अशी शपथ आज भोमवासीयांनी घेतली. यावेळी दोन्ही आमदारांना ग्रामस्थांतर्फे निवेदन देण्यात आले.

यावेळी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई, रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते.

GFP President Vijai Sardesai support Bhoma Villagers
Cortalim Car Accident : कुठाळ्ळीत भरधाव कारची विजेच्या खांबाला धडक; तिघेजण जखमी

विजय सरदेसाई म्हणाले, "गोव्यातील जनता ही प्रश्न विचारणारी, सुसंस्कृत आहे. गोव्यातील जनता वेडी नाही. उत्तर प्रदेशातील असू शकते. आम्ही मतांसाठी येथे आलो नाहीत तर आम्ही येथील जनतेच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. कोणाची प्रॉपर्टी आहे. एका उद्योजकाची जमीन वाचवण्यासाठीच गावातून चौपदरी रस्ता नेण्यासाठी सरकार आग्रही आहे."

"श्रीपाद नाईक खासदार आहेत. हिंदुत्ववादी सरकार मंदिरे नष्ट करुन गावाचे तुकडे करुन विकास करीत आहे. लोकांचा विकास करण्याऐवजी सरकार आपलाच विकास करीत आहे. सरकारने गोवा विकण्यासाठी काढलेले आहे. त्यासोबतच त्यांनी देवही विकायला काढले आहेत" असा आरोप आमदार सरदेसाई यांनी काढला.

GFP President Vijai Sardesai support Bhoma Villagers
Goa Forest Tourism : वनक्षेत्रातील पर्यटनाशी संबधित उपक्रम 'जीएफडीसी' हाताळणार | Gomantak Tv

आमदार विरेश बोरकर म्हणाले, "गोमंतकीयांची मंदिरे आणि घरे पाडण्याचा डाव सरकारकडून होत आहे. सरकार भोमवासीयांची दिशाभूल करीत आहे. वृत्तपत्रांमध्ये नोटीस जाहीर करण्यात आली आहे. सरकारने गावकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. गोयकारांचे सरकारला काळजी नाही."

ब्रिटीश काळातील "डिव्हायड अॅन्ड रुल" पॉलिसी राबविण्यास सरकारने सुरु केलेली आहे. गावकारांचा एकवटच सरकारला जागे करु शकते. गोवा फॉरवर्ड भोमवासीयांसोबत आहे असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com