गौतम खट्टरला 48 तासांत अटक करा! सासष्टीत वातावरण तप्त; आप, कॉंग्रेससह सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार

Gautam Khattar 48 Hours Arrest Deadline: गौतम खट्टर यांना ४८ तासात अटक करा, अशी मागणी दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोर जमलेल्या लोकांनी केली.
Gautam Khattar Arrest Deadline
Gautam Khattar Arrest DeadlineDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सेंट फ्रान्सिस झेवियरसंबधी आक्षेपार्ह विधानानंतर  सासष्टीत वातावरण तापले असून, डॉ. गौतम खट्टर यांना  ४८ तासात अटक करा, अशी मागणी दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोर जमलेल्या लोकांनी केली. खट्टरविरोधात   कॉंग्रेस, ‘आप’ या राजकीय पक्षांबरोबरच  सामाजिक कार्यकर्त्यांनीही  पोलिसांत तक्रार नोंदविली.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो या आपल्या समर्थकांसमवेत पोलिस ठाण्यात आल्यानंतर, पोलिसांनी प्रवेशद्वार बंद केले. यावेळी कुतिन्हो व अन्य लोकांनी पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला.

Gautam Khattar Arrest Deadline
Goa Weather: कडक उन्हात पावसाची एन्ट्री; राज्यात पुढील तीन दिवस 'अवकाळी'चे संकट, 'यलो अलर्ट' जारी

दक्षिण गोवा तसेच कुशावती जिल्ह्याचे  पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी या सर्व तक्रारदारांना खट्टर याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कायद्याप्रमाणे पुढील तपास चालू असल्याचे सांगितले. वास्को येथील टिळक मैदानावर शनिवारी सायंकाळी भगवान परशुराम जन्मोत्सवनिमित्त सनातन धर्म रक्षा समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात खट्टर यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले होते.

त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. धार्मिक तेढ निर्माण केल्याबाबत त्याच्यावर गुन्हा नोंद करून अटक करावी, अशी एकमुखी  मागणी करण्यात आली.  केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी  खट्टर यांना अटक करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देत असल्याचे सांगितले.

Gautam Khattar Arrest Deadline
Goa Crime: पगार-जेवणाच्या वादातून साळगाव 'दुहेरी हत्याकांड', पाच महिन्यांनंतर संशयित ओडिशातून जेरबंद

पोलिसांनी तो गोव्याबाहेर गेला असेल तर त्याला पकडावे, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वी सुभाष वेलिंगकर यांनीही असेच  आक्षेपार्ह शब्द  वापरले होते. आम्ही पुढे असा प्रकार खपवून घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत मडगाव गट काँग्रेस निमंत्रक सावियो कुतिन्हो तसेच दक्षिण गोवा काँग्रेस अध्यक्ष आसीस नोरोन्हा हजर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com