पणजी : बोरिवली-मुंबईतील ज्या महिलेने गौरव बिद्रेविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली आहे, त्यात ती महिला आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली आहे. त्यामुळेच या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर तो 2019 मध्ये गोव्यात आला व न्यायालयीन तारखांना गेलाच नाही.
(Hearing against Gaurav Bidre in Borivali court)
या विनयभंगप्रकरणी बोरिवली येथील न्यायालयात 12 सप्टेंबर 2022 रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणात 23 मार्च 2019 रोजी गौरवला जामीन मिळाला, त्यानंतर काही दिवसांनी त्याने गोवा गाठला. सांतिनेज येथील एका जिममध्ये त्याने काही दिवस प्रशिक्षण देण्याचे काम केले. काही महिन्यांतच त्याने सांतिनेज येथील जिम सोडली. त्याने रायबंदर येथील जिममध्ये प्रशिक्षक म्हणून काम मिळविले आणि राहण्यासाठी कदंब पठारावर फ्लॅट घेतला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायबंदर येथील ज्या जिममध्ये तो प्रशिक्षण देत होता, त्या ठिकाणी गौरी आचारी व्यायामासाठी जात होती. त्याच दरम्यान गोवा विद्यापीठात काम करणारी एक प्राध्यापिकाही तेथे जिमसाठी जात होती.
अगोदर गौरवची नजर त्या प्राध्यापिकेवर गेली होती, परंतु ती हाताला लागणार नाहीत असे दिसल्यानंतर गौरी आचारीकडे त्याने लक्ष केंद्रित केले. पुढे त्याने गौरी आचारीशी सलगी वाढविली आणि तिच्या घरी जाण्यास सुरवात केली. पुढे मैत्रीचा परिपाक काय झाला हे सर्व राज्याला माहीत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.