Scrapyard Goa
Scrapyard GoaDainik Gomantak

Fatorda : स्क्रॅपयार्डमध्ये गॅसचा स्फोट; दोन कामगार गंभीर जखमी

स्क्रॅपयार्ड हटवण्याची नागरिकांची मागणी
Published on

Fatorda : फातोर्डा चांदवाडो येथे असलेल्या स्क्रॅपयार्ड मध्ये गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले. ही घटना स्क्रॅप वाहन कापताना गॅसचा स्फोट झाल्याने घडली. जखमींना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे .

Scrapyard Goa
President's Police Medal : गोव्याच्या चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक

दरम्यान या प्रकारामुळे स्थानिकांनी हे स्क्रॅपयार्ड इतर ठिकाणी हलवण्याची मागणी केली आहे. आज झालेली ही तिसरी घटना असून यापूर्वी येथे अशाच दोन घटना घडलेल्या आहेत. ही घटना आज सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली. अधिक माहिती अशी की, स्क्रॅप यार्डमध्ये काम करीत असलेले दोघे कामगार गॅस कटरच्या मदतीने गाडीचा पत्रा कापण्याचे काम करीत होते. या दरम्यान गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. या नंतर दोघांनाही रुग्णवाहिकेतून जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Scrapyard Goa
National Gallantry Award : गोव्याच्या सुपुत्राचा राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मान

या विषयी माहिती देताना नगरसेवक कामिलो बारेतो यांनी सांगितले की, या स्क्रॅप यार्डमुळे येथील परिसर धोक्याचा बनला आहे. या ठिकाणी एकंदरीत 15 च्या आसपास स्क्रॅप यार्ड असून जवळच लोकांची घरे आहेत. तसेच जवळच रस्ता आहे. या रस्त्यावरून लोक ये जा करीत असतात आणि हे स्क्रॅपवाले रस्त्यावरच गॅसच्या सहाय्याने गाडी कापण्याचे काम करतात.

या पूर्वी असाच स्फोट होऊन दोघा जणांचा मृत्यू झाला होता. या स्क्रॅपचालकाकडे नगरपालिकेचा व इतर कुठलाही परवाना नाही. हे स्क्रॅप यार्ड इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी कामिलो यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको करु असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com