National Gallantry Award : गोव्याच्या सुपुत्राचा राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मान

2018 साली यशने पाळी नदीत एका युवकाला बुडताना वाचवले होते
Yash Prahar Sawardekar
Yash Prahar SawardekarDainik Gomantak
Published on
Updated on

National Gallantry Award : कुडचडेच्या यश प्रहर सावर्डेकर याची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आज यशचा नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

2018 साली यश सावर्डेकर याने पाळी नदीत एका युवकाला बुडताना वाचवले होते. त्याच्या याच शौर्यासाठी त्याला शासनाकडून राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. गोव्याच्या सुपुत्राचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Yash Prahar Sawardekar
Mahadayi Water Dispute: मोठ्या भावाची दमदाटी खपवून घेतली जाणार नाही; सरदेसाईंचा बोम्मईंना ईशारा

13 वर्षांचा असताना यशने प्रसंगावधान आणि धाडसाची प्रचीती दिली. 2018 साली जलतरण कौशल्य यशने पणाला लावले. पाळी डिचोलीतील म्हादई नदीच्या पात्रात बुडणाऱ्या 22 वर्षीय तरुणाचा जीव वाचवला. स्वताच्या जीवाची पर्वा न करता त्याने ही उल्लेखनीय कामगीरी केली.

यश आणि त्याचे कुटुंबीय पिकनीकसाठी गेले होते. यावेळी ते पिकनीकचा आनंद घेताना त्याना नदीच्या पात्रातून आवाज आला. यावेळी त्याने व त्याच्या वडिलांनी पाहिले असता सुमारे 150 मिटर अंतरावर नदीच्या पात्रात एक युवक बुडताना दिसुन आला.

त्याने जीवाची पर्वा व क्षणाचाही विलंब न करता त्याने पात्रात उडी मारली व युवकाचे प्राण वाचविले. दरम्यान, त्याच्या या शौर्याबद्दल त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आज यशला नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com