कोलमोरोड येथे कचऱ्याचे ढीग, उघड्या वीज वाहिन्या

मडगाव नगरपालिका व मतदारसंघात समावेश असलेल्या नावेली बाजूच्या कोलमरोड हा परिसर पूर्वींपासून गैरकृत्यांसाठी प्रसिद्ध
power lines
power linesDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगाव नगरपालिका व मतदारसंघात समावेश असलेल्या नावेली बाजूच्या कोलमरोड हा परिसर पूर्वींपासून गैरकृत्यांसाठी प्रसिद्ध आहे. या दिवसात हा परिसर कचऱ्याचे ढीग व उघड्या वीज वाहिन्यांमुळे चर्चेत येऊ लागला आहे. सोनसोडो येथे आग लागल्यानंतर येथील प्रश्नही ऐरणीवर येत आहेत.

या भागात स्व. मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम आहे व त्याच्या 50 मीटर अंतरावर जिल्हा वाचनालय आहे. त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवण्याची स्थानिकांबरोबरच नगरसेवक, नगरपालिका, आमदार, वीज खाते यांचीही जबाबदारी आहे. शिरवडे येथील कोकण रेल्वे उड्डाणपूल बंद असल्यामुळे वाहतूक या बाजूने वळविण्यात आली आहे. कोकण रेल्वे उड्डाणपूल ते नावेली येथील चर्च या रस्त्याच्या बाजूलाही कचऱ्याचे ढीग आहेत.

power lines
म्हादई नदीवर आता वीज प्रकल्पाची संक्रांत..!

ट्रान्सफॉर्मर धोकादायक

गेल्या तीन चार दिवसात स्व. मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम ते कोकण रेल्वे स्थानक पर्यंतच्या रस्त्याच्या बाजूला प्लास्टिक व दारुच्या बाटल्यांचे, पिशव्यांचे ढीग आहेत. हा कचरा मेविल्टन हाऊसिंग सोसायटीजवळ आहे. शिवाय जिल्हा वाचनालयसमोर ट्रान्सफॉर्मर उघडा असून वीजवाहिन्याही खुल्या आहेत. हात लागल्यास धोका ठरू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com