Morjim Beach: मोरजी किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य! पर्यटन खाते स्वच्छता राखण्यात सपशेल अपयशी

Morjim: हा कचरा उचलण्यासाठी आणि किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी एजन्सीला ताकीद द्यावी, अशी मागणी मोरजीचे सरपंच पवन मोरजे यांनी केली आहे
Morjim: हा कचरा उचलण्यासाठी आणि किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी एजन्सीला ताकीद द्यावी, अशी मागणी मोरजीचे सरपंच पवन मोरजे यांनी केली आहे
Morjim BeachDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पर्यटन खात्याने ज्या एजन्सीला कचरा उचलण्याचे कंत्राट दिले होते, त्या एजन्सीमार्फत नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने टेंबवाडा - मोरजी समुद्र किनाऱ्यावर कचरा साचल्याने पर्यटकांना अस्वच्छतेचे दर्शन घडत आहे.

पर्यटन खाते किनाऱ्यावर स्वच्छता राखण्यात अपयशी ठरली आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी लक्ष घालून हा कचरा उचलण्यासाठी आणि किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी एजन्सीला ताकीद द्यावी, अशी मागणी मोरजीचे सरपंच पवन मोरजे यांनी केली आहे.

खाण व्यवसायावर निर्बंध घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात सरकारला महसूल मिळवून देणाऱ्या पर्यटन व्यवसायाकडे सरकारने पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. या माध्यमातून दरवर्षी सरकाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, परंतु त्यातील किती टक्के महसूल सोयी सुविधांवर खर्च केला जातो हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. मोरजी किनारी भागात पार्किंग व्यवस्था व्यवस्थित नाही. किनारा स्वच्छ ठेवला जात नाही. चेंजिंग रूम, शौचालयाची सोय व्यवस्थित केली गेली नाही. त्यामुळे या किनाऱ्यावर एकदा आलेले पर्यटक पुन्हा येण्यास धजावत नाहीत.

कचऱ्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर

मोरजी पंचायत क्षेत्राला लाभलेली तीन किलोमीटरची किनारपट्टी पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. या किनाऱ्यावर पूर्वी तीन चार महिनेच पर्यटक येत असत, परंतु हल्ली वर्षाचे बाराही महिने पर्यटक येत असतात. त्यामुळे स्थानिकांना रोजगार तसेच छोट्या - मोठ्या व्यावसायिकांना व्यवसाय मिळतो, परंतु या किनाऱ्यावर सध्या सर्वत्र कचरा साचल्याचे व्हिडिओ व छायाचित्रे येथे येणारे पर्यटक समाज माध्यमांवर टाकून किनाऱ्याची बदनामी करत आहेत.

Morjim: हा कचरा उचलण्यासाठी आणि किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी एजन्सीला ताकीद द्यावी, अशी मागणी मोरजीचे सरपंच पवन मोरजे यांनी केली आहे
Morjim Beach: तेमवाडा-मोरजी येथे बीच बेड्सना 'ग्रीन सिग्नल'; कासवांना उपद्रव नाही

पर्यटनमंत्र्यांनी पाहणी करण्याची मागणी

किनारी भागातील रस्त्यांवर तसेच समुद्र किनाऱ्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात कचरा पसरल्याचे भयानक चित्र सध्या दिसून येत आहे. सरकार लाखो रुपयांचे कंत्राट कचरा उचलणाऱ्या एजन्सीला देते, परंतु कंत्राटदाराकडून नियमितपणे कचरा उचलला जातो की नाही हे पाहण्याकडे मात्र सरकारचे लक्ष नसते. पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खवटे यांनी या किनारी भागात अचानक भेट देऊन कचरा उचलणारे कामगार हा कचरा व्यवस्थित उचलतात की नाही याची पाहणी करावी आणि त्या एजन्सीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या वर्षी पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे किनारी भागात आले होते. त्यावेळी किनारी भागातील कचऱ्यांविषयीच्या समस्या त्यांच्यासमोर मांडली होती. त्यावेळी मंत्री रोहन खवटे यांनी आपण यात लक्ष घालणार असल्याचे सांगितले होते, परंतु अद्याप तशीच स्थिती आहे. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे केवळ एक कामगार पूर्ण किनारपट्टीचा कचरा कसा काय उचलणार? सरकारने यात लक्ष घालून किनारे स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावेत.

पवन मोरजे, सरपंच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com