नावेलीत बायपास शेजारी कचऱ्याचे ढीग; नागरिक त्रस्त

नागरिकांनी मडगाव नगरपरिषद आणि नावेली ग्रामपंच्यातील अधिकाऱ्यांना या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
Garbage
Garbage Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नावेली येथील पश्चिम बायपासकडे जाणारा सर्व्हिस रोड हा कचरा टाकण्याचे ठिकाण बनले आहे. रस्त्याच्या कडेचा भाग प्लास्टिक, खाद्यपदार्थ, प्लॅस्टिकच्या बाटल्या या टाकाऊ वस्तूंनी भरला आहे. (garbage heaps on service road connected to western bypass)

Garbage
गोव्याच्या जुळ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी बनवला बर्ड ड्रोन

येथील नागरिकांनी मडगाव नगरपरिषद (MMC) आणि नावेली ग्रामपंच्यातील अधिकाऱ्यांना या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. याठिकाणी दररोज कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी. परिणामी येथे कचरा टाकण्याचा प्रकार थांबेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Garbage
'ग्लेन टिकलो यांनी हळदोणेत हस्तक्षेप करणे थांबवावे'

सर्व्हिस रोडच्या कडेला सर्वत्र कचरा पडलेला असतो. यामुळे आजूबाजूच्या भागात रोग पसरण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, असे येथील नागरिक म्हणाले.

आताच कारवाई न केल्यास येथे टाकलेल्या कचऱ्याचे प्रमाण वाढत जाईल आणि नंतर तो कचरा साफ करणे अधिकाऱ्यांसाठी कठीण होईल, असेही नागरिक म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com