गोव्याच्या जुळ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी बनवला बर्ड ड्रोन

चित्रपट महोत्सवात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
Bird Drone
Bird DroneDainik Gomantak

पणजी: दिप्तेश नेशारी आणि दिपेश नेशारी या जुळ्या द्वितीय वर्षाच्या इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी पक्षासारखा दिसणाऱ्या ड्रोनची रचना केली आहे. या ड्रोनचे सादरीकरण विज्ञान चित्रपट महोत्सवात येथे करण्यात आले. हे दोन्ही विद्यार्थी SREIT अभियांत्रिकी महाविद्यालय, शिरोडा येथे शिक्षण घेत आहेत. (Engineering students develop bird shaped drone in goa)

Bird Drone
कोरोना काळात गोव्यात ‘लिव्‍हर’ रुग्णांत मोठी वाढ

“या प्रकल्पासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. आम्ही ऑक्टोबर 2021 पासून ड्रोनचे (Drone) काम करत आहोत. आम्ही आधी 3 महीने यावर संशोधन केले आणि मग मुळ कमाला सुरुवात केली. आम्हाला यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र आम्ही हातात घेतलेले काम पूर्णत्वास नेले,” दीपेश म्हणाला.

Bird Drone
पाच वर्षांसाठीचे व्हिजन तयार करा: विश्‍वजित राणे

दिप्तेश म्हणाला, "आम्ही उरी या बॉलिवूड (Bollywood) चित्रपट बघून प्रेरित झालो. आम्ही तयार केलेला ड्रोन पाळत ठेवण्यासाठी किंवा विमानाच्या मार्गाने उडणाऱ्या पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी एअरलाइन्सद्वारे वापरले जाऊ शकतो."

चित्रपट (Movie) महोत्सवात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. “विज्ञान शिक्षकांनी तरुण विद्यार्थ्यांसह विज्ञान संस्थांना भेट देण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि राज्यात अधिकाधिक वैज्ञानिक घडवावेत,” असे सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com