Sonsodo Garbage Plant: सोनसडोचा कचरा पोलिस बंदोबस्तात काकोड्याला

Sonsodo Garbage Plant: सुनावणी ११ रोजी : खंडपीठाला दिली माहिती. येथील 35 टन ओल्या कचऱ्यापैकी 20 टन कचरा काकोडा येथे नेण्यात येत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने खंडपीठाला दिली
Goa Garbage Issue
Goa Garbage IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Cacora Garbage Treatment Plant: मडगावातील सोनसडो येथील ओला कचरा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 सप्टेंबरपासून काकोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेण्याचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू झाले आहे.

येथील 35 टन ओल्या कचऱ्यापैकी 20 टन कचरा काकोडा येथे नेण्यात येत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने खंडपीठाला दिली.

या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देत उच्च न्यायालयाने ही सुनावणी 11 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

Goa Garbage Issue
Goa Politician Scandal: मंत्र्याची बदनामी; 10 दिवसांनंतरही तपास शून्य

फायर हायड्रंट हवे

सोनसडो येथील कचऱ्याच्या ठिकाणी सुमारे १२ लाख रुपये किमतीच्या चार ‘फायर हायड्रंट’साठी निविदा काढली असून लवकरच ते उपलब्ध केले जातील, अशी माहिती मडगाव पालिकेने उच्च न्यायालयाला दिली.

या ठिकाणी वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने तेथे अग्निशमन दलाचे पाण्याचे बंब उपलब्ध नसतात, अशी माहिती मागील सुनावणीवेळी निदर्शनास आणून देण्यात आली होती, तेव्हा न्यायालयाने मडगाव पालिकेला हे फायर हायड्रंट प्राधान्याने खरेदी करण्याचे निर्देश दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com