Margao Municipal Council: कचरा टाकायचा कुठे? नगरपालिकेसमोर मोठा प्रश्न

Margao Garbage Issue: मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होण्याची शक्यता रहिवासी व्यक्त करत आहेत
Margao Garbage Issue: मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होण्याची शक्यता रहिवासी व्यक्त करत आहेत
Margao Garbage Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी, ता. ६ (प्रतिनिधी) : मडगाव व फातोर्डा शहरांमधील जमा झालेला विविध प्रकारचा कचरा नक्की टाकायचा कुठे, ही एक मोठी समस्या मडगाव नगरपालिकेसमोर निर्माण झाली आहे. या दिवसांत झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्याचे काम सुरू आहे. शिवाय पावसाळ्यात नागरिकही आपल्या बागेतील किंवा परसातील झाडांची कापणी करतात. हे नागरिक हा कचरा रस्त्यावरच टाकतात. त्यामुळे अशाप्रकारचा कचरा नेमका कुठे टाकायचा, हा मोठा प्रश्न मडगावात नगरपालिकेसमोर उद्भवला आहे.

सध्या नगरपालिकेचे मजूर हा कचरा जिथे जिथे मोकळी सरकारी जागा आहे, तिथे टाकत असून अनेक भागात कचऱ्याच्या राशी दिसू लागल्या आहेत. पण त्याचबरोबर आजूबाजूच्या रहिवाशांनाही त्याचा त्रास होत असून मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होण्याची शक्यता हे रहिवासी व्यक्त करत आहेत.

गेले कित्येक दिवस एसजीपीडीए मार्केटसमोर रवींद्र भवन रस्त्याच्या बाजूला झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात टाकण्यात आल्याचे दिसत आहे. इथे पूर्वी काही खासगी बसमालक आपल्या बसेस ठेवत. त्याचप्रमाणे मे महिन्यामध्ये झालेल्या फेस्त फेरीतील फर्निचरचे स्टॉल याच जागेवर उभारण्यात आले होते. तेव्हा ही जागा स्वच्छ करण्यात आली होती. गेल्या महिना-दीड महिन्याच्या काळातच अशा प्रकारचा कचरा इथे टाकण्यात आला आहे.

मैदानाच्या जागेत कचरा

फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगावात आले होते, तेव्हा कदंब बसस्थानकाचे स्थलांतर इनडोअर स्टेडियमच्या बाजूला असलेल्या हॉकी मैदानासाठी राखून ठेवलेल्या जागेत करण्यात आले होते. त्यानंतर त्याच जागेवर सर्कसचे प्रयोगही झाले होते. आता याच जागेवर कचरा टाकण्यात आला आहे.

Margao Garbage Issue: मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होण्याची शक्यता रहिवासी व्यक्त करत आहेत
House Collapses At Margao: जोरदार पावसामुळे घरे कोसळण्‍याच्‍या घटना सुरूच

सरकारी जागेत साठवणूक

सध्या कचरा सरकारी जागेत टाकला जात असल्याचे मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी मान्य केले. नागरिक पावसाळ्यात आपल्या घरासमोरील किंवा घरामागील बागेतील कामे करतात व हा कचरा रस्त्यावरच टाकतात. हा कचरा नगरपालिकेने उचलावा, असे त्यांना वाटते. मात्र, पालिकेसमोर हा कचरा टाकण्यास सध्या जागेचा मोठा प्रश्‍न असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

मडगाव पालिकेसमोर झाडांच्या धोकादायक फांद्या कापलेला कचरा कुठे टाकावा, हा प्रश्न आहे. ओला व सुका तसेच प्लास्टिक कचरा सोनसडोवर पाठवला जातो. आपण पालिका अभियंत्याला सरकारी जागेतील कचरा हटविण्यास सांगितले आहे. आज एसजीपीडीए मार्केटसमोरील जागेत मोठी क्रेन झाडे हटविण्याच्या कामात गुंतली होती.

दामोदर शिरोडकर, नगराध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com