Ganesh Chaturthi 2023 In Goa
Ganesh Chaturthi 2023 In GoaDainik Gomantak

Ganesh Chaturthi 2023: राज्यात गणरायाच्या आगमनाची लगबग; माटोळीच्या साहित्याचे दर यंदा चढे

बाजारात तुडुंब गर्दी; प्रत्येक शहरात आज वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र

Ganesh Devotees Bring Ganpati Bappa Home: राज्यभरात आज दिवसभर गणरायाला घरी आणण्याची लगबग होती. दिवसभरात अनेकवेळा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तरी गोमंतकीयांच्य उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.

बाजारात माटोळीचे साहित्य व सजावटीचे साहित्य खरेदीसाठी आज मोठी गर्दी उसळली होती. रस्त्‍याशेजारी असे अनेक बाजार कालपासून सुरू झाले आहेत.

चवथ या पारंपरिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवासाठी देश विदेशातील गोमंतकीय गावी येण्यास शनिवारपासूनच सुरवात झाली आहे.

सणाच्य निमित्ताने खरेदीसाठी जाण्यासाठी सर्वांनीच आपल्‍या चारचाक्या रस्त्यावर आणल्याने राज्यभरातील प्रत्येक शहरात आज वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

Ganesh Chaturthi 2023 In Goa
निवडणुकीसाठी शिक्षकी पेशातील व्यक्ती कलेक्शन एजंट बनली होती का? चोडणकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

उधाणत्या उत्साहात गणरायाच्या मूर्ती घरोघर नेल्या जात होत्या. मूर्ती नेण्यासाठी आपल्याच वाहनाला अनेकांनी पसंती दिली होती. त्यामुळे कुटुंबासोबत बाप्पा घरी चालल्याचे चित्र दिसून येत होते.

गणेशोत्‍सव मंडळानीही श्रींची मूर्ती मंडपात नेण्यासाठी सोमवारी सकाळचाच मुहूर्त निवडल्याने टेंपो व ट्रकमधून गणपतीच्या मोठ्या मूर्ती नेताना दिसून येत होत्या.

मंडळाचे कार्यकर्ते अधून मधून फटाके फोडत होते आणि घोषणाही देत होते. त्यामुळे वातावरण निर्मिती होण्यास मदत होत होती. महागाई आहे असे गेले काही महिने सांगण्यात येत होते. विरोधकांकडून तसा आरोप केला जात होता.

मात्र, आज गणेशभक्तांच्या उत्साहाच्या लाटेत महागाई कुठल्या कुठे वाहून गेली होती. प्रत्येक बाजारात मिनिटागणिक हजार रुपयांची उलाढाल होत होती. माटोळीसाठी लागणाऱ्या साहित्याचे दर यंदा चढे असले तरी गणेशभक्तांनी त्यांच्या खरेदीसाठी हात आखडता घेतला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com