'गंदी बात' फेम अभिनेत्री सबा सौदागरने गोव्यात बॉयफ्रेन्ड चिंतन शाहसोबत केले लग्न; पाहा फोटो

अभिनेत्री सबाने 'बू सबकी फटगी', 'क्रॅकडाउन' आणि 'गंदी बात' यासह अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अभिनय केला आहे.
actress Saba Saudagar weds writer director chintan shah in Goa
actress Saba Saudagar weds writer director chintan shah in GoaDainik Gomantak

Actress Saba Saudagar weds writer director chintan shah in Goa: 'गंदी बात' या वेब सिरीजमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सबा सौदागरने गोव्यातील एका विवाह सोहळ्यात तिचा बॉयफ्रेन्ड चिंतन शाह याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. सबा आणि चिंतन जवळपास 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

अभिनेत्री सबाने 'बू सबकी फटगी', 'क्रॅकडाउन' आणि 'गंदी बात' यासह अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अभिनय केला आहे. तर, चिंतन लेखक-दिग्दर्शक असून त्याने हिंदी भाषेतील नाटक 'सिमरन' (2017) आणि इतर अनेक विविध प्रकारचे लिखाण केले आहे.

अभिनेत्री साबा सौदागर आणि लेखक-दिग्दर्शक चिंतन शाह यांनी 14 मे 2023 रोजी गोव्यात लग्न केले. दोघांच्या लग्नाला केवळ त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. लग्नाच्या ठिकाणी दिवे, फुले आणि विविध आरास करत सजवण्यात आले होते.

actress Saba Saudagar weds writer director chintan shah in Goa
Siddharth -Kiara Viral Photo : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ जपानमध्ये घेतायत सुट्टीचा आनंद...फोटो व्हायरल...
actress Saba Saudagar weds writer director chintan shah in Goa
actress Saba Saudagar weds writer director chintan shah in GoaDainik Gomantak

लग्नासाठी सबाने एक लाल रंगाचा पोशाख परिधान केला होता. या ड्रेसमध्ये साबा अतिशय सुंदर दिसत असून, चिंतनने सफेद रंगाचा कुर्ता घातला आहे. दोघांचे व्हाईट-रेट कॉम्बिनेशन अतिशय मनमोहक दिसत आहे.

लग्नाची भावना अतिशय सुंदर असून, लग्नानंतर माझे आयुष्य कमालीचे बदलले आहे. अशा शब्दात सबाने तिच्या भावाना व्यक्त केल्या आहेत.

actress Saba Saudagar weds writer director chintan shah in Goa
Siddharth -Kiara Viral Photo : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ जपानमध्ये घेतायत सुट्टीचा आनंद...फोटो व्हायरल...

सबाला डेस्टिनेशन लग्न करायची इच्छा होती तसेच, ड्रीम हनीमून डेस्टिनेशनबद्दल देखील यापूर्वी बोलली होती. सबाला तिच्या पतीसोबत 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटातील सीन रिक्रिएट करायचा होता.

दरम्यान, दोघांना लग्नानंतर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com