गालजीबाग नदीचे पात्र बनले अरुंद

काठावर वाढली झाडे; नदीतून गाळ काढण्याची स्थानिकांची मागणी
Galgibaga River
Galgibaga RiverDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण : पैंगीण आणि लोलये पंचायत क्षेत्राची जीवनदायिनी असलेल्या गालजीबाग नदीचे पात्र दिवसेंदिवस अरुंद आणि उथळ बनत आहे. त्याला नैसर्गिक कारणांबरोबरच मानवनिर्मित कारणे जबाबदार आहेत. नदीचे पात्र अरुंद होत असल्याने लगतच्या रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे.

Galgibaga River
दोडामार्गातील फुकेरी धरणाचे काम महाराष्ट्राकडून सुरूच...

गेल्यावर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात या नदीला पूर आला होता. त्याशिवाय 2 ऑक्टोबर 2009 मध्ये प्रलयंकारी पूर येऊन नदी काठची गाळये, तामने येथील घरे कोसळली होती. त्यावेळी या नदीचे पात्र गाळमुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, ती मागणी अद्याप धसास लागली नाही.

नदीचे पात्र नदीच्या दोन्ही काठावर वाढलेल्या वृक्षांनी अरूंद बनले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अडून सखल भागात दरवर्षी पूरसदृश परिस्थिती उद्‍भवते. या नदीच्या काठालगत पैंगीण बाजार आणि काही शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यावेळी येथील विद्यार्थी आणि रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे.

Galgibaga River
वीज वाहिनीच्या दुरुस्तीवेळी झटका बसून कर्मचाऱ्याचा मृत्यू

आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासनाने या नदीच्या आकसत असलेल्या पात्राची दखल घेऊन कार्यवाही करावी,अशी मागणी येथील रहिवाशांतून होत आहे. 2009 मध्ये आलेल्या पुरात पैंगीण येथील दोन नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यासाठी नदीचे पात्र गाळमुक्त करून नदीकाठची झाडांची छाटणी करून पाण्याच्या प्रवाहाला वाट करून देण्याची मागणी येथील काही नागरिकांनी जलस्त्रोत खात्याकडे केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com