G20 Energy Ministers Meeting 2023 : ‘जी-20’ ऊर्जा बैठकीत 700 कोटींचे करार

पर्यावरणपूरक स्वयंपाक : बीईई, उद्योगक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, सरकारी मध्यवर्ती यंत्रणा (एसडीए), विकास संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते
Goa G-20 Summit
Goa G-20 Summit Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa G-20 Summit : एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक उपक्रमांच्या प्रमुख जॉइंट व्हेंचरतर्फे, गोव्यात झालेल्या 14 व्या मंत्रीस्तरीय ऊर्जा बैठकीत (सीईएम) ‘अॅक्सलरेटिंग इंडिया नेट झिरो ट्रांझिशन थ्रू एनर्जी एफिशिएन्सी, सस्टेनेबल कूलिंग अँड मोबिलिटी’ या प्रभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत ईईएसएलने ७०० कोटी रुपयांचे करार केले

लेह येथील लदाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलचे एग्झिक्युटिव कौन्सिलर स्टँझिन चोस्फेल; ओडिशा सरकारचे मुख्य सचिव प्रदीप कुमार जेना, आंध्रप्रदेश सरकारचे मुख्य सचिव अजय जैन आणि तिलमान कुबान (जर्मन बुण्डस्टॅगचे सदस्य)

या मान्यवरांसह बीईई, उद्योगक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, सरकारी मध्यवर्ती यंत्रणा (एसडीए), विकास संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाचा भाग म्हणून, ईईएलएलने यूएसएआयडी इंडियाच्या सहयोगाने तयार केलेले नवीन ऊर्जा कार्यक्षमता धोरण सर्वांपुढे ठेवले. भारताच्या शून्य कार्बन उत्सर्जन उद्दिष्टाच्या दिशेने जाण्यात या धोरणाची महत्त्वाची भूमिका आहे.

Goa G-20 Summit
Uber In Goa : गोव्यात टॅक्सी सेवा सुरु करणाऱ्या 'उबर'विरोधात तक्रार दाखल

शिवाय, ईईएसएलने युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अर्थात यूएसएआयडी इंडियाबरोबर धोरणात्मक एमओयूवर (सामंजस्य ठरावावर) स्वाक्षरी करून कार्बनमुक्तीप्रती बांधिलकीही अधिक दृढ केली.

ह्याद्वारे भारत भविष्यकालीन धोरणांना व कार्यक्रमांना आकार देणार आहे. रूपांतरणात्मक भागीदारीमध्ये अतिकार्यक्षम शीतकरण व औष्णिकीकरण,

एकात्मिक ऊर्जा कार्यक्षमता सेवा, उपयुक्तता ऊर्जा व्यवस्थापन, मागणीतील लवचिकता, इलेक्टिक वाहतूक आणि दक्षिण आशियातील प्रादेशिक विस्तार ह्यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.

Goa G-20 Summit
Goa Drowning Accidents : चिंतेची बाब; गोव्‍यात दर चौथ्‍या दिवशी एकाचा बुडून मृत्‍यू

15 निर्णायक ठराव

क्लिन एनर्जी मिनिस्टेरिअलच्या अखत्यारीत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये १५ निर्णायक सामंजस्य ठरावांचे आदान प्रदान झाले. ह्यातून ऊर्जा उपलब्धता,

पर्यावरणपूरक स्वयंपाक, कार्बनमुक्ती व ऊर्जा कार्यक्षमता या क्षेत्रात नवोन्मेषकारी उपाय शोधण्याप्रती ईईएसएलचे समर्पण दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com