Trains To Goa: गोव्याला ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर, जुलैपर्यंत वाढवल्या फेऱ्या

उन्हाळ्याच्या सुट्या जवळ येताहेत, याकाळात अनेकजण गोव्याला प्रवास करत असतात.
Trains
TrainsDainik Gomantak
Published on
Updated on

उन्हाळ्याच्या सुट्या जवळ येताहेत, याकाळात अनेकजण गोव्याला प्रवास करत असतात. होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाने गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नागपूर-मडगाव-नागपूर (Nagpur Margao Railway) या विशेष रेल्वेगाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाच्या वतीने गोव्याला जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्या जुलै महिन्यापर्यंत चालविण्यात येणार आहेत.

1) नागपूर-मडगाव (रेल्वेगाडी क्रमांक 01139) ही 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत धावणारी द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी 1 जुलै 2023 पर्यंत धावणार आहे.

2) तर, 26 फेब्रुवारीपर्यंत धावणारी रेल्वेगाडी क्रमांक 01140 मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी 2 जुलैपर्यंत चालविण्यात येणार आहे.

Trains
गोवा, केरळचे 'मॉडेल' आता उत्तराखंडमध्ये, पर्यटनासाठी सरकारने उचलेले मोठे पाऊल

आरक्षण सुरू

दोन्ही रेल्वेगाड्यांचे आरक्षण 22 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, या दोन्ही गाड्यांच्या वेळेत, थांब्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com