गोवा, केरळचे 'मॉडेल' आता उत्तराखंडमध्ये, पर्यटनासाठी सरकारने उचलेले मोठे पाऊल

उत्तराखंडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण मोड्यूल ठरवले जाणार आहे.
Uttarakhand
Uttarakhand Dainik Gomantak

गोवा आणि केरळच्या धर्तीवर उत्तराखंडमध्ये लवकरच पर्यटन पोलिसांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी नवा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. ज्या शहरांमध्ये वर्षभर पर्यटक येतात, त्या शहरांमध्ये पर्यटन पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात येणार आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांना पर्यटक मार्गदर्शकाप्रमाणे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

उत्तराखंड पोलिस केरळ आणि गोवा पोलिसांच्या रचनेचा अभ्यास करत आहेत. या धर्तीवर उत्तराखंडमध्येही पर्यटन पोलिसांची स्थापना करण्यात येणार आहे. पर्यटन पोलिसांच्या रचनेसाठी लवकरच शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. ही रचना किती मोठी असेल, हे सरकारशी चर्चा करूनच ठरवले जाईल. पर्यटन पोलिसांसाठी वेगळा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. उत्तराखंडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण मोड्यूलही ठरवले जाणार आहे.

"उत्तराखंड हे एक पर्यटन राज्य आहे. येथील अनेक शहरांमध्ये वर्षभर करोडो लोक पर्यटन आणि तीर्थयात्रेसाठी येतात. पर्यटन पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधून समस्या दूर करण्याची गरज आहे, यावर भर दिला जात आहे. गेल्या वर्षी पर्यटन मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यामध्ये सर्व राज्यांना आपापल्या राज्यात मजबूत पर्यटन पोलीस तयार करण्यास सांगण्यात आले होते." असे पोलिस प्रवक्ते आणि एडीजी गुन्हे आणि कायदा आणि सुव्यवस्था व्ही मुरुगेसन म्हणाले.

Uttarakhand
हैद्राबादसारखी घटना गोव्यातही घडू शकते! 5 वर्षात 87,202 जणांना 'डॉग बाईट', 2022 मध्ये सर्वाधिक घटना

राज्याच्या इतिहास, भूगोलची माहिती पोलीस ठेवणार

पर्यटकांना केवळ कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस मदत करणार नाहीत. उलट त्यांना मार्गदर्शक म्हणून मदत देखील करतील. त्यासाठी पोलिसांना राज्याचा इतिहास आणि भूगोल याचीही माहिती दिली जाणार आहे. त्यांना येथील महत्त्वाची ठिकाणे, मंदिरे इत्यादी तपशीलवार सांगितले जाईल.

चारधाम यात्रा मार्गावर अधिक बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे. या वेळी अनेक महसुली क्षेत्रांचा नियमित पोलिसांत समावेश केल्याने यात्रा मार्गावर हंगामी पोलिस ठाणी व चौक्यांची संख्या वाढू शकते. जेणेकरून भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यासाठी मंगळवारी होणाऱ्या शासकीय बैठकीत पोलिस आपला आराखडा मांडू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com