Maha Kumbh: सांगितले 34 लागले 40 तास; महाकुंभमेळ्यात गोमंतकीयांच्या पदरी हालअपेष्टा, संगमाच्या ठिकाणी पोचेपर्यंत पुरेवाट

Kumbhmela Goa Railway: राज्य सरकारने समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवदर्शन योजनेखाली बाराशे जणांना मोफत रेल्वेने प्रयागराज येथे जाण्याची व्यवस्था केली आहे.
Kumbhmela Goa Railway
Kumbhmela Goa RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

Free train ride issues Goa devotees Prayagraj Kumbh Mela

पणजी: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यानिमित्त मोफत रेल्वेच्या माध्यमातून गंगेत डुबकी मारण्यासाठी गेलेल्या गोमंतकीयांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. तशाही स्थितीत प्रचंड मनोबलाच्या आधारे पवित्र संगमात स्नान करून हे भाविक आज मध्यरात्री १ वाजता परतीच्या प्रवासासाठी निघणार आहेत.

राज्य सरकारने समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवदर्शन योजनेखाली बाराशे जणांना मोफत रेल्वेने प्रयागराज येथे जाण्याची व्यवस्था केली आहे. ६ रोजी सकाळी ८.३० वाजता मडगावहून ही रेल्वे प्रयागराजच्या दिशेने रवाना झाली होती. यानंतर ११ व त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजीही अशी रेल्वे उपलब्ध असेल.

सरकारने सुरुवातीला ३४ तास या प्रवासाला लागतील, असे सांगितले होते. त्यानुसार प्रयागराजपासून अडीच किलोमीटर अलीकडे ही रेल्वे सायंकाळी सहा वाजता पोचणे अपेक्षित होते. मात्र, वाटेत दुसऱ्या रेल्वेना बाजू देण्यासाठी ही रेल्वे बाजूला ठेवत गेल्याने हा प्रवास आणखीन सहा तासांनी वाढला.

Kumbhmela Goa Railway
Mahakumbh: गोव्याच्या मंत्री, आमदारांचा 'बहुचर्चित' महाकुंभ दौरा रद्द; मौनी अमावस्येच्या गर्दीमुळे बदलली तारीख

संगमापर्यंत जाताना अक्षरश: पुरेवाट

रेल्वेतून जाताना अनेकजण भजन करत गेले होते. मध्ये रेल्वे थांबलेल्या ठिकाणी महिला भाविकांनी फुगड्याही घातल्या होत्‍या. सर्व जणांनी प्रयागराजच्या अलीकडील रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर मोठमोठ्याने जयघोषही केले. प्रत्यक्षात संगमाच्या ठिकाणी पोचेपर्यंत त्‍यांची अक्षरश: पुरेवाट झाली. वाटेत निवाऱ्याची व्यवस्था नसल्याने चालत राहण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता.

Kumbhmela Goa Railway
Maha Kumbh Mela 2025: महाकुंंभसाठी गोवा सरकार सोडणार Special Train; तारीख, वेळ जाणून घ्या, तिकीट कसे मिळणार?

तब्बल आठ किमीची पायपीट

रेल्वे स्टेशनपासून अडीच किलोमीटरवर त्रिवेणी संगमाची जागा असेल, असे वाटून साऱ्यांनी त्या दिशेने चालणे सुरू ठेवले. रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. बोचणारा वारा आणि हाडे गोठविणारी थंडी यांचा सामना करत सारेजण पायपीट करत होते. प्रत्यक्षात आठ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालत कापल्यानंतर नदीकाठाचे त्यांना दर्शन झाले , असे अनेक अनुभव भाविकांनी कथन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com