नोकरीच्या बहाण्याने पणजीतील कंपनीकडून 80 हजाराची फसवणूक

आम आदमी पार्टीचे नेते सिसेल रॉड्रिग्ज यांनी केला आरोप
Online fraud
Online fraud Dainik Gomantak
Published on
Updated on

panjim News: नोकरीच्या बहाण्याने पणजीतील एका रिक्रूटमेंट एजन्सीने तरुणांकडू 80 हजारपेक्षा अधिक रक्कम उकळत फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत आम आदमी पार्टीचे नेते सिसेल रॉड्रिग्ज यांनी माहिती दिली आहे.

(panji News Fraud of 80 thousand by Talentent Hunt consultancy company on the pretext of jo)

Online fraud
Fatorda News: फातोर्डा येथे 48 लाखांच्या फसवणूक प्रकरणात न्यायालयाने एकाचा जामीन फेटाळला

आम आदमी पार्टीचे नेते सिसेल रॉड्रिग्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार पणजीतील एका रिक्रूटमेंट एजन्सीने गोव्यातील काही तरुणांना कुवैतला काम देतो असे सांगत 80 हजाराहून अधिक रुपयाची फसवणूक केली आहे. त्यांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी भारतात येत ही माहिती दिली आहे.

Online fraud
Officers Transfer: गोवा नागरी सेवेतील 21 कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश

युवकांनी अशी माहिती दिली की, हाताला काम नसल्याने आम्ही नोकरीच्या शोधात होतो. कोविडनंतर आपण पेपरमधील जाहीरात पाहात नोकरीसाठी संपर्क केला. यावर Talentent Hunt cnsultancy या कंपनीने नोकरीचे अमिष दाखवत 80,0000 मध्ये नोकरी लावणार असे सांगितले. व युवकांना स्वखर्चाने तिकीट बुक करावयास लावले. व युवकांना कुवेतला पाठवले.

पून्हा कुवेतला पाठवलेल्या युवकांना कुवेतवरुन बळजबरीने कामावरुन राजीनामा देण्यास भाग पाडत अनुक्रमे 3, 6, 9 महिन्यांनी पून्हा भारतात पाठवले. यावेळी तरुणांच्या पालकांना एजन्सीकडून धमक्याही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नंतर या युवकांनी व त्यांच्या पालकांनी पून्हा कोणाची अशा प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी दूतावासात तक्रार दाखल केली. व पुन्हा कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून Talentent Hunt cnsultancy या कंपनीचा परवाना रद्द करण्याची मागणी ही केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com