Bolmax Pereira apologized For His Controversial statement On chatrapati shivaji Maharaj : 'छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे हिरो आहेत; पण देव नाही, त्यांना तुम्ही देव मानू नका', असे वक्तव्य करणारे फादर बोलमॅक्स परेरा यांनी माफी मागीतली आहे. तसेच या विषयावरुन सोशल मिडीयावर जे काही चालू आहे ते बंद करुन आपण सगळे एकत्र येवूया असे आवाहन त्यांनी केले आहे.
"मला कोणाच्याही भावना दूखवायच्या नव्हत्या. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर 'सॉरी' असे फादर बोलमॅक्स परेरा यांनी सांगितले.
"माझ्यासह संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांचे कौतुक करते. त्यांनी धर्माचा वापर न करता सर्वांना एकत्र केले. अशा नेत्यांची गरज आहे. शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरून आपण सर्व एकत्र येण्याऐवजी दुभंगत आहोत हे मी स्वीकारू शकलो नाही म्हणून मी माफीनामा जारी केला."
"माझे भरपूर हिंदू मित्र, फॉलोवर्स आहेत. ऐवढी वर्ष आपण एकत्र आहोत. या वक्तव्यामुळे आपल्या मध्ये फूट पडता नये. सोशल मिडीयावर जे काही चालू आहे ते बंद करुन आपण एकत्र राहूया. ख्रिश्चन, हिंदू समस्त गोयकारांना आवाहन करतो की आपण एकत्र येवून शांती राखूया" असे फादर बोलमॅक्स परेरा म्हणाले.
फादर बोलमॅक्स परेरांचे ते वक्तव्य
फादर बोलमॅक्स परेरा एसएफसी चर्च चिखली येथे बोलताना वक्तव्य केले होते. परेरा यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वत्र व्हायरल झाला.
"काही दिवसांपूर्वी कळंगुटमध्ये एक घटना घडली. येथील पंचायतीचा सरपंच सरपंच ख्रिचन असल्याने मोठा वाद झाला. छत्रपती शिवाजी देव झालेत, पण शिवाजी महाराज देव नाहीत. शिवाजी राष्ट्रीय हिरो आपण त्यांना मान दिला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे."
"या राज्यासाठी त्यांनी केलं त्याचा आपण आदर केला पाहिजे. ते हिरो आहेत पण देव नाहीत. पण हिंदू लोकांनी त्यांना देव केलं आहे. खरेच हिंदू खतरे में है, असे मी पुन्हा म्हणतो. आपण हिंदूंना विचारायला हवे की छत्रपती शिवाजी महाराज तुमचा देव? तर ते देव नाहीत राष्ट्रीय हिरो आहेत" असे वक्तव्य परेरा यांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.