Canacona Loliem-Polem: माजी सरपंचाची गळफास घेऊन आत्महत्या

Canacona: लोलये - पोळे पंचायतीचे माजी सरपंच निशांत प्रभुदेसाई यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली
Canacona Loliem-Polem
Canacona Loliem-PolemDainik Gomantak
Published on
Updated on

Canacona Loliem-Polem: लोलये - पोळे पंचायतीचे माजी सरपंच निशांत प्रभुदेसाई वय 42 यांनी काल रात्री आपल्या राहत्या घरात पंख्याला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी एका आठवड्यापूर्वी धारधार चाकूने त्यांनी आपल्या हाताला कापून घेतल्याने त्यांच्या हाताला पंधरा टाके पडले होते. पोलिसानी मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर आज नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

Canacona Loliem-Polem
Goa Update| खरी कुजबूज! बाप्पा, पाव रे पोलिसांना...

गेल्या पंचायत निवडणुकीत त्यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांची भावजय निवडणुकीत उतरून निवडून आली होती. सोमवारी संध्याकाळी उशीरापर्यंत ते माशे बाजारात आपल्या मित्रासोबत होते, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

आत्महत्या (Suicide) करण्याची टोकाची भूमिका त्यांनी का घेतली याबद्दल त्यांच्या मित्र परिवाराला धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पैंगीण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्यामागे आई - वडील, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com