शिवोलीतील माजी आमदारांनी जनतेची सेवा करण्यापेक्षा स्वत:चेच भले केले

विनोद पालयेकर (Vinod Palyekar) यांनी फक्त स्वत:चा वैयक्तिक फायदा करून घेतला; ॲड. विष्णु नाईक यांची टीका
Siolim Constituency
Siolim ConstituencyDainik Gomantak

Siolim Constituency: गेल्या विधानसभेची निवडणूक आपण आपच्याच तिकीटावर शिवोलीतून लढवली होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून येथील लोकांशी माझे जवळचे संबंध आहेत. दुर्दैवाने मार्च 2017 ते जानेवारी 2022 याकाळात शिवोलीच्या (Siolim Constituency) आमदारपदी विराजमान झालेल्या विनोद पालयेकर (Vinod Palyekar) यांनी स्वत:चा वैयक्तिक चांगल्यापैकी फायदा करून घेतला; परंतु विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या मतदारांच्या डोळ्यांना मात्र पुरती पाने पुसल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे शिवोलीचे उमेदवार ॲड. विष्णु नाईक यांनी केला आहे. आपल्या जवळच्या समर्थकांसमवेत बादे-शिवोलीत प्रचार कार्याची सुरुवात केल्यानंतर ॲड. नाईक प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, हणजुण कायसुव पंचायतीच्या क्षेत्रात मोडणाऱ्या बादे-आसगाव तसेच शापोरात गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याची उग्र समस्या स्थानिक महिलांना सतावत आहे. त्याशिवाय याभागातील खंडीत वीज पुरवठा आता नेहमीचीच गोष्ट होऊन बसलेली आहे. (Former MLAs in Siolim did better for themselves than serving the people)

Siolim Constituency
भाजपचे मूळ कार्यकर्ते जयेश साळगावकरांसोबतच: श्रीपाद नाईक

गेली कित्येक वर्षे सत्तास्थानी असलेल्या भाजपाचे (BJP) दयानंद मांद्रेकर आणि त्यानंतर सत्तेत आलेल्या गोवा फॉरवर्डचे विनोद पालयेकर यांना येथील समस्यांचे निवारण करावेसे कधीच वाटले नाही. जनतेच्या समस्यांवरच या दोन्ही माजी आमदारांनी स्वत:ची पोळी भाजून घेतल्याचा आरोप नाईक यांनी यावेळी केला.

त्यामुळेच शिवोलीचा यंदाच्या निवडणुकीत (Goa Election 2022) स्वाभिमानी शिवोलकरांनी आम आदमीला (AAP) एकदाच संधी देण्याची मागणी ॲड. नाईक यांनी दिली. याभागातील दुसरी महत्त्वाची आणि तितकीच समस्या म्हणजे येथील बेरोजगारी. गेली पाच वर्षे सत्तास्थानी असलेल्या भाजपने बेकारांना नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवित सतत झुलवत ठेवले, ही लांन्छनास्पद गोष्ट असल्याचे विष्णू नाईक यांनी सांगितले. मतदारांनी यंदा मतदान करतांना शिवोलीचा विकास नजरेसमोर ठेऊनच मतदान करण्याचे जोरदार आवाहन शेवटी ॲड. विष्णु नाईक यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com