भाजपचे मूळ कार्यकर्ते जयेश साळगावकरांसोबतच: श्रीपाद नाईक

भाजपचे मूळ कार्यकर्ते जयेश साळगावकर यांच्याबरोबरच कार्यरत असून, त्यांचा भाजपलाच पाठिंबा आहे, असा दावा खासदार श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी केला.
भाजपचे मूळ कार्यकर्ते जयेश साळगावकरांसोबतच: श्रीपाद नाईक
भाजपचे मूळ कार्यकर्ते जयेश साळगावकरांसोबतच: श्रीपाद नाईकDainik Gomantak

म्हापसा: साळगाव मतदारसंघातील भाजपचे मूळ कार्यकर्ते जयेश साळगावकर यांच्याबरोबरच कार्यरत असून, त्यांचा भाजपलाच पाठिंबा आहे, असा दावा केंद्रीय मंत्री तसेच उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी केला आहे. साळगाव मतदारसंघाच्या प्रचारदौऱ्याच्या दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.

श्रीपाद नाईक पुढे म्हणाले, की भारतीय जनता पार्टी हा जगभरातील एक मोठा राजकीय पक्ष आहे व या पक्षात सर्व कार्यकर्त्यांना कुटुंबाप्रमाणे वागणूक दिली जाते. कार्यकर्त्यांमध्ये कितीही अंतर्गत हेवेदावे असले तरी ते आपसात असतात. तरीही भाजपसाठी (BJP) अनेक दशके काम करणारे व शून्यापासून वर काढून पक्षाला तेजोवलय देणारे बहुसंख्य झुंजार कार्यकर्ते भाजपला सोडून दूर जाऊच शकत नाही. ते योग्य वेळेवर निर्णय घेतील. साळगावमध्ये सर्व जुनी मंडळी भाजपसाठी जयेश यांच्यासोबत पिरताना विसते व त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते कार्यरत आहेत, हे त्याचेच एक उदाहरण आहे, असेही ते म्हणाले. (BJP workers are Along with Jayesh Salgaonkar Shripad Naik said)

भाजपचे मूळ कार्यकर्ते जयेश साळगावकरांसोबतच: श्रीपाद नाईक
गोव्यातील कोरोना परिस्थितीत सुधार; रुग्णसंख्येसह पॉझिटिव्हिटी दरातही घट

जयेश साळगावकर हे उत्तम नेते आहेत. सत्तेवर असताना किंवा सत्तेबाहेर असताना त्यांच्‍या स्वभावात काहीही बदल दिसत नाही, असे नमूद करून श्रीपाद नाईक म्हणाले, लोकांशी विनम्रतेने वागणे, इतरांना मदतीचा हात देणे व मतदारसंघ कुठेही मागे राहू नये यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करून विकासकामे मार्गी लावणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने साळगावची जनता त्यांच्‍यावर खूश आहे व स्वत:चा पाठिंबा जयेश साळगावकरांना ते नक्की देतील, अशी खात्री मला या मतदारसंघात फिरल्यानंतर मिळाली, असेही ते म्हणाले.

स्वाभिमानी मतदार पैशांना बळी पडणार नाहीत : साळगावकर

जयेश साळगावकर (Jayesh Salgaonkar) म्हणाले, या दौऱ्याच्या निमित्ताने श्रीपाद नाईक यांनी मतदारांशी छोटेखानी बैठकांच्या माध्यमातून स्नेहसंवाद साधला. व श्रीपादभाऊंच्या आगमनाने भाजपचे अनेक जुने कार्यकर्ते पुन्हा पक्ष मजबूत करण्यासाठी जोमाने काम करत असल्याचे वातावरण साळगावमध्ये दिसून येते. केवळ पैशांच्या बळावर निवडून येण्याची स्वप्ने काँग्रेस पक्ष पाहत आहे व साळगावच्या जनतेला लाचार बनवून त्यांनाच लुटण्याची स्वप्ने पाहत आहे. परंतु साळगाववासीय हे स्वाभिमानी आहेत व योग्य जागा मायकल लोबोंच्या एजंटांना दाखवतील, असे मतही साळगावकर यांनी व्यक्त केले.

काँग्रेस चांगले नेतृत्व देऊच शकत नाही...

श्रीपाद नाईक म्हणाले, काँग्रेस पक्षाने या देशाला एकदम गरिबीत ढकलले. तसेच देशाला किंवा गोव्याला योग्य दिशा देण्यात ते सर्वच बाबतींत अपयशी ठरले आहेत. सध्या ते पराभवाच्या छायेत असल्याने ते काहीबाही बोलतात व खोटी आश्वासने देऊन मतदारांची फसवणूक करताना दिसतात. त्या पक्षात असलेल्या तीव्र मतभेदांमुळे ढासळलेला काँग्रेस (Congress) पक्ष गोव्याला चांगले नेतृत्व देऊच शकत नाही व काँग्रेसमुक्त गोवा हा नारा नक्की प्रत्यक्षात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com