Vinod Palienkar harassment complaint
Vinod Palienkar harassment complaintDainik Gomantak

Vinod Palienkar: माजी मंत्री विनोद पालयेकरांविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार! म्हापसा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

Vinod Palienkar harassment complaint: म्हापसा पोलिसांनी माजी मंत्री विनोद पालयेकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६९, ७५ (२) व ३१८ (४) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
Published on

म्हापसा: मूळ उत्तर भारतीय एका पंचवीस वयोगटातील युवतीवर कथित शारीरिक, लैंगिक अत्याचार तसेच वैयक्तिक फसवणूक केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी माजी मंत्री विनोद पालयेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. ही लैंगिक तसेच फसवणुकीची घटना २०१९ व २०२६ मध्ये घडली, असे तक्रारीत म्‍हटले आहे.

या प्रकरणी पीडित युवतीने लेखी तक्रार म्हापसा पोलिसांत दिली होती. पीडित युवती ही माजी मंत्र्यांच्या निवासस्‍थानी घरकाम करायची. या काळात, मंत्र्यांनी आपले लैंगिक अत्याचार व शारीरिक शोषण केले, तसेच आपली वैयक्‍तिक फसवणूक केली, असा दावा पीडित युवतीने आपल्या तक्रारीत केली आहे.

त्‍यानुसार म्हापसा पोलिसांनी माजी मंत्री विनोद पालयेकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६९, ७५ (२) व ३१८ (४) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, विनोद पालयेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. काही महिन्यांपूर्वीच पालयेकर यांची बायपास सर्जरी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Vinod Palienkar harassment complaint
Pernem: पेडण्‍यातील 3 जागांवर भाजप-मगो युतीची बाजी, हरमलमध्ये अपक्ष राधिका पालयेकर यांची सरशी

दरम्यान, पालयेकर यांचे तत्कालीन ‘ओएसडी’ आनंद पालयेकर यसंदर्भात म्हणाले की, विनोद पालयेकर यांच्याविरोधात रचलेला हा बनाव आहे. शिवोली मतदारसंघात राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांना संपवण्याचा डाव रचला जात असून विनोद पालयेंकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार हा त्याचाच हा भाग आहे.

Vinod Palienkar harassment complaint
शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांचा राजीनामा; अपक्ष निवडणूक लढणार

तपास अधिकाऱ्यांसमोर ४ वेळा हजेरी

१ या हाय प्रोफाईल गुन्ह्याबद्दल पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. गेल्या पंधरा दिवस आधी नोंद झालेल्या या गुन्हाबाबत पोलिस स्थानक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठेही वाच्यता केली नाही.

२ याप्रकरणी पोलिसांनी माजी मंत्र्यांना नोटीस बजावल्यापासून, संशयित माजी मंत्री पालयेकर यांनी तपास अधिकाऱ्यांसमोर आतापर्यंत चारवेळा हजेरी लावल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या पोलिसांकडून माजी मंत्र्यांची चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com