Panjim Porvorim Accident: पणजीत बसने चिरडून तर पर्वरीत ट्रकखाली आल्याने दोन महिला ठार

Panjim Porvorim Accident: पणजी आणि पर्वरीत शुक्रवारी सकाळी दोन वेगवेगळे अपघात झाले. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.
Panjim Porvorim Accident
Panjim Porvorim AccidentDainik Gomantak

Panjim Porvorim Accident: पणजी आणि पर्वरीत शुक्रवारी सकाळी दोन वेगवेगळे अपघात झाले. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.

पहिला अपघात पणजी बसस्थानकात झाला यात एका खासगी बसने चिरडल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, पर्वरीत झालेल्या दुसऱ्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कदंब बसस्थानकावर सकाळी एका खासगी बसने महिलेला चिरडले. बसचे मागील चाक महिलेच्या अंगावरून गेले. यात महिलेचा मृत्यू झाला आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, अपघात कसा घडला याचा तपास पोलीस करत आहेत.

पर्वरीत ट्रक आणि दुचाकीच्या अपघाताची दुसरी घटना झाली. यात ट्रकने चिरडल्याने महिलेचा मृत्यू झाला. NH66 महामार्गावर धरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसली, यामुळे दुचाकीच्या मागे बसलेली महिला उसळून ट्रकच्या चाकाखाली आली.

ट्रकने चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. तसेच, दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com