Panjim: महापौरांना आली उशिरा जाग..!

Panjim: पार्किंग शुल्क बंद: कामांच्या पाहणीनंतर निर्णय
Uday Madkaikar
Uday Madkaikar Dainik Gomantak

Panjim:

पणजी शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पार्किंग शुल्क 31 मेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. त्याविषयी महापौर रोहित मोन्सेरात यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली खरी, परंतु माजी उपमहापौर वसंत आगशीकर यांनी 2022 मध्येच डिसेंबर महिन्यात पार्किंग शुल्क बंद करण्याची विनंती महानगरपालिका आयुक्तांना केली होती,

ती विनंती फेटाळण्यात आली होती. त्यावेळीच निर्णय घेतला असता, तर 27 महिन्यांच्या पार्किंग शुल्कचा भुर्दंड वाहनधारकांना पडला नसता हे यातून स्पष्ट दिसून येत आहे.

पणजी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांना गती आली आहे. विविध रस्त्यांची कामे सुरू असल्याने शहरातील पे-पार्किंग शुल्क न आकारण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिले आहेत.

Uday Madkaikar
DR. Ram Manohar Lohia: डॉ. राम मनोहर लोहियांचा जयंतीदिनी सरकारला विसर

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) सीईओ संजीत रॉड्रिग्ज यांच्याबरोबर गुरुवारी त्यांनी पणजीतील कामाची पाहणी केली, त्यावेळी महापौरांना रस्त्याच्या कामाचा अंदाज आला. त्यातूनच त्यांनी 24 मार्चपासून 31 मेपर्यंत पे-पार्किंग शुल्क आकारले जाणार नाही, असे सांगितले. त्यात पाटो परिसराचाही समावेश आहे.

पणजीतील अनेक मार्गावर पार्किंग शुल्क आकारले जाते. महत्त्वाच्या १८ जून, आत्माराम बोरकर मार्ग, चर्च स्क्वेअर येथे पार्किंग शुल्क आकारले जाते, परंतु सध्या वाहनधारकांना वाट काढत ये-जा करावी लागत आहे.

Uday Madkaikar
Water Pollution: राज्यात जलप्रदूषणावरून लपवाछपवी!

नागरिकांना मुर्खात काढण्याचा प्रकार कामांची काल पाहणी केल्यानंतर पार्किंग शुल्क आकारणी बंद करण्याचा निर्णय घेणे म्हणजे नागरिकांना मूर्खात काढण्याचा प्रकार आहे. अगोदरच पार्किंग शुल्क आकारणीची निविदा देण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे. कोणीही पार्किंग आकारणीचा प्रस्ताव दिला नव्हता, तरीही एकाच कंत्राटदाराला पुन्हा पार्किंग शुल्क आकारणी निविदा दिली गेली आहे. पणजीतील रस्त्यांचे काम करण्याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. त्यामुळे साबांखाचा रस्त्यावर अधिकार असेल, तर पार्किंग शुल्क आकारण्याचा अधिकार महानगरपालिकेला का?

- मिनीन डिक्रुझ, माजी नगरसेवक

उशिरा का होईना सुचले तरी! स्मार्ट सिटीची कामे सुरू झाल्यापासून पणजीकरांनी आणि वाहनधारकांनी बराच त्रास सहन केलेला आहे. वाहनांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही, हे वास्तव मागील कित्येक दिवसांपासूनचे आहे. किमान उशिरा का होईना, पण शहाणपण सुचले असे आजच्या निर्णयामुळे म्हणता येईल. दोन महिने तरी थोडासा वाहनधारकांना दिलासा मिळेल.

- उदय मडकईकर, माजी महापौर तथा नगरसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com