DR. Ram Manohar Lohia: डॉ. राम मनोहर लोहियांचा जयंतीदिनी सरकारला विसर

DR. Ram Manohar Lohia: राज्यात सरकारी पातळीवर कार्यक्रम नाही
DR. Ram Manohar Lohia
DR. Ram Manohar LohiaDainik Gomantak
Published on
Updated on

DR. Ram Manohar Lohia:

राज्य सरकारने अलीकडेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, स्व. फ्रान्सिस्को लुईश गोम्स यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त सरकारी पातळीवर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी या कार्यक्रमांना राज्य कार्यक्रमाचा दर्जा दिला.

असे करताना गोवा मुक्तीसाठी जनमानसात असलेल्या भावनेला फुंकर घालणारे डॉ. राम मनोहर लोहिया यांचा सरकारला विसर पडला आहे. आज (शनिवारी) त्यांची जयंती असूनही सरकारी पातळीवर मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते.

डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त आग्वाद किल्ला आणि जेल कॉम्प्लेक्स सिकेरी येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

DR. Ram Manohar Lohia
Goa Police: लाच प्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन

18 जून रोजी (गोवा क्रांती दिन) वसाहतवादी राजवटीविरुद्ध बंड करण्यास प्रेरित केल्याबद्दल, दिवंगत गांधीवादी स्वातंत्र्यसैनिकाला 1946 मध्ये याच तुरुंगात कैद केले होते.

सरकारने डॉ. आंबेडकर, गोम्स यांच्या बाबतीत निर्णय घेतल्यानंतर गोमंतकीय असंतोषाचे जनक मानल्या जाणाऱ्या लोहिया यांची जयंती व पुण्यतिथी ही राज्य कार्यक्रम म्हणून साजरी केली जाईल, असे वाटत होते. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत लोहिया यांचा सरकारला विसर पडलेला दिसतो.

DR. Ram Manohar Lohia
Goa Politics: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून पल्लवी धेंपेंच्या नावाची औपचारिकता

कोणीतरी बीजारोपण करतो. कालांतराने फळे चाखणारे झाडाला धन्यवाद देतात. आताही तसेच झाले आहे. लोहियांना सारे विसरत चालले आहेत. आता तर झाडालाही विसरून केवळ फळांकडेच लक्ष लागले आहे. याशिवाय आणखी चांगल्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्तच करता येत नाही.

- लिबिया लोबो सरदेसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com