Dinesh Trikannad : माजी क्रिकेटपटू दिनेश त्रिकन्नाड यांचे निधन

आज अंत्‍यसंस्‍कार : गोव्‍याच्‍या क्रिकेट विकासात मौलिक योगदान
Dinesh Trikannad
Dinesh TrikannadDainik Gomantak

Former cricketer and Businessman Dinesh Trikannad : माजी क्रिकेटपटू व उद्योजक दिनेश त्रिकन्नाड यांचे बुधवारी (12जुलै) अल्पआजाराने मडगाव येथे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गोव्याच्या क्रिकेट विकासात त्‍यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. गोव्याला रणजी दर्जा तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सदस्यत्व मिळवून देण्यास त्यांनी परिश्रम घेतले होते.

गोव्याला रणजी दर्जा मिळाला नव्हता तेव्हा त्यांनी गोवा क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले होते. राज्य सीनियर निवड समितीचे ते अध्यक्ष होते. देशातील अनेक नामवंत क्रिकेटपटूंशी त्‍यांचे निकटचे संबंध होते.

दिनेश त्रिखन्नड यांचा जन्म उडपी इथे २४ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. ते एक अष्टपैलू अॅथलेलिटही होते. धारवाड विद्यापीठाच्‍या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांत त्‍यांनी प्रतिनिधीत्व केले होते. कर्नाटक विद्यापीठाचा ते कर्णधार होते.

त्यांनी राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेतही प्रतिनिधित्व केले होते. कामानिमित्त १९६६ साली ते गोव्यात आले व गोवा हीच त्यांची कर्मभूमी ठरली. गोव्यात त्यांनी तिंबलो क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व केले. सलग २० वर्षे अखिल गोवा आंतरशालेय स्व. मुकुंद त्रिखन्नड स्पर्धा चालवली. मडगाव क्रिकेट क्लबचे ते सदस्य होते.

Dinesh Trikannad
Sonali Phogat Death Case: सोनाली फोगट हत्या प्रकरणातील आरोपी सुखविंदरला जायचंय हरियाणाला, न्यायालयात याचिका

गोमंतकीय क्रिकेटची मोठी हानी

मी एका जवळच्या मित्राला मुकलो. दिनेश त्रिखन्नड यांचे क्रिकेटसाठीचे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. तिंबलो क्लबसाठी खेळत असताना माझे ते आदर्श खेळाडू होते. त्यांच्या निधनाने गोमंतकीय क्रिकेटची न भरून येणारी हानी झाली आहे.

- दिगंबर कामत, मडगावचे आमदार

मडगाव क्रिकेट क्लबच्या जडणघडणीत दिनेश त्रिखन्नड यांचे योगदान महत्वाचे होते. क्रिकेट क्षेत्रातील व्यक्तींसह इतर अनेकांनाही त्‍यांनी दिलदारपणे मदत केली. त्यांच्या निधनाने क्रिकेट, क्रिकेटपटूंचे मोठे नुकसान झाले आहे.

- आदित्य आंगले, मडगाव क्रिकेट क्लबचे सदस्य

दिनेश यांचे क्रिकेटबद्दलचे प्रेम वादातीत होतेच, शिवाय त्यांचा उदार स्वभाव व युवा क्रिकेटपटूंना देत असलेले प्रोत्साहन खरोखरच वाखाणण्यासारखे होते. १९६४ साली भारतीय संघाबरोबर एका मित्रत्वाच्या सामन्यात खेळताना त्यांनी ५ बळी मिळविले होते.

- विनोद धामस्कर, माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com