Goa: वन खात्याच्या सहकार्याने कारापुरात वनमहोत्सव

झाडांमुळे पृथ्वीतलावरील प्रत्येक प्राणीमात्राला प्राणवायू मिळत असतो, असे प्रतिपादन मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी वनमोहोत्सवात केले.
वनमहोत्सव
वनमहोत्सवDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: झाडे ही आपली मित्र आहेत.झाडांमुळे पर्यावरण संतुलित राहत असून, झाडांमुळे पृथ्वीतलावरील प्रत्येक प्राणीमात्राला प्राणवायू मिळत असतो. तेव्हा झाडांची योग्यरित्या निगा राखून त्यांचे संवर्धन आणि जतन करणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन मयेचे आमदार तथा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांट्ये यांनी व्यक्त केले. (Forest Festival in Karapur in collaboration with Forest Department in Bicholim)

वन खात्याच्या क्षेत्रीय वन विभाग, केरीच्या सहकार्याने कारापूर येथे ज्ञानज्योती हायस्कुलच्या पटांगणात आयोजित केलेल्या वनमहोत्सव कार्यक्रमात आमदार झांट्ये प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते.

वनमहोत्सव
Goa: सोनसोड्यावरील सद्याच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय

यावेळी कारापूर-सर्वणचे सरपंच गोकुळदास सावंत, उपसरपंच दामोदर गुरव, पंच सुषमा सावंत, नीता मोरजकर, उज्वला कवळेकर, रसूल मदार, योगेश पेडणेकर, इजास खान, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, युवा मोर्चा अध्यक्ष सीताराम सावंत, मयेचे उपसरपंच कृष्णा परब, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, वन खात्याचे अधिकारी, वनरक्षक तसेच ज्ञानज्योती हायस्कुलचे शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमदारांच्या हस्ते वृक्षारोपण आणि झाडांचे वाटप करण्यात आले. गोकुळदास सावंत यांनी स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com