Leopard in Goa
Leopard At Bicholim LamgaoDainik Gomantak

Leopard In Goa: बिबट्या सापळ्यात अडकेना! लामगावात 'रात्री' शुकशुकाट; स्थानिकांत वाढती दहशत

Leopard At Bicholim Lamgao: बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याकडून लामगाव येथील एका कुळागरात सापळा (पिंजरा) लावला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत बिबट्या सापळ्याजवळ फिरकलाच नसल्याची माहिती मिळाली आहे.
Published on

Trap Set For Leopard At Bicholim Lamgao

डिचोली, : शहरातील लामगाव भागात दहशत घातलेला बिबट्या काही केल्या सापळ्यात अडकत नसल्याने स्थानिकांमधील भीती वाढली आहे.

या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याकडून रविवारी (ता.१०) लामगाव येथील एका कुळागरात सापळा (पिंजरा) लावला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत बिबट्या सापळ्याजवळ फिरकलाच नसल्याची माहिती मिळाली आहे. लामगाव भागात दहशत घातलेला बिबट्या कधी एकदाचा सापळ्यात अडकतोय, त्याकडे लामगाववासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या दहा-बारा दिवसांपासून डिचोलीतील लामगाव परिसरात भर लोकवस्तीत बिबट्याची दहशत वाढली आहे. लोकवस्तीत घुसून दोन पाळीव मिळून आतापर्यंत पाच कुत्र्यांना (श्वान) या बिबट्याने फस्त केल्याची माहिती मिळाली आहे. हा बिबट्या लोकवस्तीजवळ संचार करीत असताना अनेकांच्या नजरेला पडला आहे. भर लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने लामगाव परिसरातील लोक भयभीत झाले आहेत. बिबट्याच्या संचारामुळे तर काहीजण सायंकाळनंतर तर घराबाहेर पाडण्याचे धाडस करीत नाहीत.

Leopard in Goa
Panaji: 'भाडेकरार' नाही, तर ‘ना हरकत’ नाही! मनपाची कारवाई; मार्केटमधील दुकानांची तोडली ‘वीज’

पंधरा महिन्यांत दोन बिबटे जेरबंद

शहरातील धबधबा आणि डिचोलीच्या जवळील मुळगाव येथे मिळून गेल्या पंधरा महिन्यांत दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले आहे. डिचोली शहरासह आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांचा अधिवास आहे. धबधबासह नार्वे, शिरगाव आदी काही ग्रामीण भागात अधूनमधून बिबट्यांचे दर्शन होत आहे. बोडकी झालेली जंगले त्यातच खाण व्यवसायामुळे आणि बिबटे भक्ष्य मिळवण्यासाठी लोकवस्तीत घुसू लागले आहेत, असा पर्यावरणप्रेमींचा दावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com