Foreign Tourists in Goa: 'चार्टर विमानांमुळे विदेशी पर्यटक वाढले'! पर्यटनमंत्री खंवटेंचा दावा; रशिया, कझाकिस्‍तानातून चांगला प्रतिसाद

Goa Tourism: कझाकिस्तानहून १७६ प्रवाशांना घेऊन चार्टर विमान गोव्‍यात आले. यातून मध्य आशियातील देशांतील नागरिकांत गोव्याबद्दलचा रस वाढलेला दिसून येत आहे, असे मंत्री खंवटे यांनी म्‍हटले आहे.
Goa Pune flight late night
FlightDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मॉस्‍को, कझाकिस्‍तानसारख्‍या देशांमधून चार्टर विमानांद्वारे पर्यटक राज्‍यात दाखल होत असल्‍याने यंदा राज्‍यातील विदेशी पर्यटकांची संख्‍याही वाढल्‍याचा दावा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्‍यक्त केला आहे.

यंदाच्‍या पर्यटन हंगामात ३० डिसेंबर रोजी मॉस्कोहून नॉर्डविंड एअरलाइन्सचे चार्टर विमान गोव्यात दाखल झाले. ज्यात ३६० पर्यटक होते. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी येकॅटेरिनबर्गहून नॉर्डविंड एअरलाइन्सचे आणखी एक चार्टर विमान ३७३ प्रवाशांसह गोव्यात आले.

सोबतच ३० डिसेंबर रोजी कझाकिस्तानहून १७६ प्रवाशांना घेऊन चार्टर विमान गोव्‍यात आले. यातून मध्य आशियातील देशांतील नागरिकांत गोव्याबद्दलचा रस वाढलेला दिसून येत आहे, असे मंत्री खंवटे यांनी म्‍हटले आहे.

Goa Pune flight late night
Goa Tourism: ‘कम टू गोवा’ एवढ्याने दर्जेदार पर्यटक गोव्यात येणार नाहीत! Social Media वरील बदनामी थांबवण्याची गरज

दरम्‍यान, चार्टर विमाने आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या स्थिर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पर्यटन विभाग विमान कंपन्या, विमानतळ प्राधिकरण आणि पर्यटन क्षेत्रातील भागीदारांसोबत समन्वय साधून सुरळीत व्यवस्था सुनिश्चित करत आहे, असे पर्यटन संचालक केदार नाईक यांनी स्‍पष्‍ट केले.

Goa Pune flight late night
Konkan Tourism: कोकणातील हा बीच आहे पर्यटकांसाठी 'मिनी मॉरिशस'; जाणून घ्या समुद्रस्नानसाठी इथेच का होते गर्दी?

पर्यटकांची गोव्यालाच पसंती

रशिया आणि मध्य आशियासारख्या देशांमधून येणाऱ्या चार्टर विमानांमध्‍ये सातत्‍याने वाढ होत आहे. यातून या देशांतील नागरिकांनी आंतरराष्‍ट्रीय पर्यटनस्‍थळ असलेल्‍या गोव्‍याला पसंती दिल्‍याचेच स्‍पष्‍ट होते. अधिकाधिक विदेशी पर्यटकांनी गोव्‍यात येऊन गोव्‍याच्‍या पर्यटनाचा लाभ घ्‍यावा, यासाठी पुढील काळात अनेक उपाययोजना केल्‍या जाणार असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com